Sunday, May 19, 2024
Homeभंडाराजलस्त्रोत पुनर्भरण कामात घोळ , अंदाजपत्रकास तिलांजली

जलस्त्रोत पुनर्भरण कामात घोळ , अंदाजपत्रकास तिलांजली

लाखनी :- वन्यप्राणी अधिवासात पिण्याचे बारमाही पाणी उपलब्ध व्हावे. याकरिता शासन प्रयत्नशील असून जलस्त्रोत पुनर्भरणास आवश्यक तो निधीही उपलब्ध केला गेला. पण काही स्वार्थी वन अधिकाऱ्यांकडून विभागाने ठरवून दिल्याप्रमाणे काम ने करता निधीची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रत्यय साकोली वन परिक्षेत्रातील नैनपूर गावालगतच्या वनतलाव खोलीकरण(गाळ काढणे) कामात आला. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडून अंदाजपत्रकानुसार जलस्त्रोत पुनर्भरणाचे काम न करता सार्वजनिक रकमेचा अपहार केल्याची शक्यता गावकऱ्यांनी वर्तविली आहे.


साकोली वनपरिक्षेत्र घनदाट अरण्य असलेला भूप्रदेश असा नाव लौकीक आहे. या वनक्षेत्राचे पूर्वेस नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प उत्तरेस न्यु-नागझिरा तर पश्चिमेस कोका वन्य जीव अभयारण्य असल्यामुळे या वनक्षेत्रातून वन्य प्राण्यांचे आवागमन सुरू असते. वनक्षेत्रातील किंवा वनक्षेत्रालगत असलेल्या वनतलावात बारमाही पाणीसाठा असावा. याकरिता वन तलावातील गाळ काढून खोलीकरनाचा कार्यक्रम वन विभागाकडून हाती घेण्यात आला आहे.
साकोली वन परिक्षेत्राअंतर्गत सह वनक्षेत्र सानगडी(पूर्व) चे अधिनस्त वनरक्षक बीट पापडा-२ नियतक्षेत्र नैनपूर येथील गावालगत असलेल्या वनतलाव खोलीकरण(गाळ काढणे) कामास आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जिल्हा निधिअंतर्गत उपवन संरक्षक भंडारा यांचेकडून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून अंदाजपत्रकीय रक्कम ७ लक्ष रुपये असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मेंढे यांचे मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक सुनील वैद्य आणि वनरक्षक सतीश गीते यांचे सनियंत्रण व देखरेखिखाली एप्रिल २०२१ मध्ये राजस्थानी ट्रॅक्टरवाल्याकडून हे वनतलाव पुनर्भरनाचे काम यंत्राचे सहाय्याने अंदाजपत्रकास बगल देऊन करण्यात आले. साकोली वन परिक्षेत्रात नियमित वनपरिक्षेत्र अधिकारी नसल्यामुळे अल्प प्रमाणात काम करून निधीची परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी मेंढे यांचे कार्यप्रणालीची तसेच नैनपूर वनतलाव खोलीकरण(गाळ काढणे) कामाची चौकशी होणे गरजेचे झाले आहे.
असे होते कामाचे स्वरूप(चौकट)
ज्या ठिकाणी जलस्त्रोत पुनर्भरणाची आवश्यकता आहे. त्या वन तलावाचे वन परिक्षेत्र अधिकारी यांनी अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मंजुरी करिता सहाय्यक वन संरक्षक व प्रशासकीय मंजुरी उपवन संरक्षक भंडारा यांचेकडून मिळाल्यानंतर ई-निविदेच्या माध्यमातून कमी दर असणाऱ्या कंत्राटदाराकडून ६० मीटर लांब , ४० मीटर रुंद आणि १ मीटर खोल वन तलावाचे खोलीकरण करण्यात यावे. असे कामाचे स्वरूप होते. पण अंदाजपत्रकाप्रमाणे काम केले गेले नाही.
प्रतिक्रिया/स्टेटमेंट(चौकट)
जिल्हा निधिअंतर्गत मौजा नैनपूर येथे वनतलाव खोलिकरनाचे काम करण्यात आले. इस्टीमेटनुसार मोजमाप झाले असून काम चांगले करण्यात आले आहे.
सतीश गीते वनरक्षक पापडा-२

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular