Tuesday, March 19, 2024
Homeवर्धाग्रामीण लसीकरण केंद्रावर ग्रामीणांना प्राधान्य द्या

ग्रामीण लसीकरण केंद्रावर ग्रामीणांना प्राधान्य द्या

वाघाडी फाऊंडेशनची मागणी ; तहसिलदारांना दिले निवेदन
समुद्रपूर : -शासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करून लसीकरण करण्याचे धोरण ग्रामीण भागातील जनतेला इंटरनेटच्या ज्ञानाभावी लसीकरणापासून वंचित ठेवणारे असून ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर शहरी भागातील जनतेचीच गर्दी होत आहे. ग्रामीणांच्या हक्काच्या लसीवर शहरी जनतेलाच फायदा होत आहे. ग्रामीण जनता लसीकरणापासून वंचित राहत असून ग्रामीण लसीकरण केंद्रावर ग्रामीण भागातीलच जनतेला लस देण्यात यावी अशी मागणी वाघाडी फाऊंडेशनने तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.


समुद्रपूर येथे नगरपंचायत कार्यालयामध्ये सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर गेल्या दोन दिवसांपासून सर्व शहरी लोक लसीकरणाचा लाभ घेताना दिसून येत आहे, शहरी भागात लसीकरण केंद्र असतानासुद्धा रांगेमध्ये उभे राहण्याचे ऐवजी ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रात मोठमोठ्या चारचाकी गाड्यांनी येऊन ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर गर्दी करताना दिसून येत आहेत.समुद्रपूर तालुक्यातील २२२ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोविड चे रुग्ण आढळून येत आहे अनेक रुग्णांना आपले प्राण सुद्धा गमवावे लागले . अनेक तरुणांचा सुद्धा बळी या आजाराने घेतला.त्यामुळे लसीकरणाची मोहीम अधिक तीव्रतेने राबविण्याची गरज असताना तालुक्यातील केंद्रांवर तिथल्या स्थानिक लोकांना लस मिळणे दुरापास्त झाले आहे .
कोविन ॲपवर नोंदणी सुरू झाल्या झाल्या पाच मिनिटाच्या आत लसीचा कोटा संपलेला असतो.
ग्रामीण भागातील लोकांना कोविन ॲप वर नाव नोंदणी कशी करावी याबद्दल पुरेशी माहिती नाही ,सोबतच ग्रामीण भागात बऱ्याच वेळा नेट कनेक्टिव्हीटी ची अडचण असते आदी कारणांमुळे ग्रामीण भागाच्या वाट्याला आलेला लसीकरणाच्या कोट्यावर शहरी लोक ताबा मिळवत आहे.
करोना आजाराचा प्रादुर्भाव थांबण्यासाठी एकमेव प्रभावी उपाय लसीकरण आहे ,अत्यंत तुटपुंज्या लसी उपलब्ध असताना त्यासुद्धा ग्रामीण भागातील लोकांना मिळणे जिकरीचे झाल्यामुळे ग्रामीण भागातील जनता या सगळ्या प्रकारामुळे आता वैतागलेली आहे , आपल्या गावाकरिता आलेली लस आपल्यालाच मिळत नसल्याने बाहेरून आलेले विरुद्ध स्थानिक असा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे निवेदनात नमूद केले आहे.वाघाडी फाउंडेशन, माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या निवेदनाद्वारे अशी विनंती आहे की ज्या गावासाठी लसींची मात्रा उपलब्ध झाली आहे त्या केंद्रावर त्याच गावातील लोकांना लसीकरणाचा लाभ देण्यात यावा , वितरण केंद्रावर स्थानिक लोकांनाच प्राधान्यक्रम दिला जावा व तशा सुधारणा कोविन ॲप मध्ये सुद्धा करण्यात याव्या जेणेकरून ग्रामीण भागातील लोक लसीकरणापासून वंचित राहणार नाही अशी मागणी वाघाडी फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रसाद चौधरी , उपाध्यक्ष मंगेश थुल , संजीत ढोके, नवनीत गंगशेट्टीवार ,निर्मल भोयर , पलाश लाजुरकर , आशिष पाटील , गौरव ईसपाडे, ललित डगवार, गौरव दोंदल ,चैतन्य काळमेघ , राहुल लाजुरकर, प्रितम घुमडे ,सचिन अनकर, नितेश थुल , विशाल ढोणे , अनिल पेंदाम , संदीप झाडे ,विवेक थुल, शुभम वाढई , रॉबीन नांदगावे, संजीव गवते , निखिल पेंदाम ,सुरज येलगुंडे ,याज्ञीक सोनुलकर , स्नेहा दिवटे , सचीन चतुर , यांनी केली आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular