Friday, April 19, 2024
Homeवर्धाकोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या स्मरणार्थ

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या स्मरणार्थ


*एक आठवण आपल्या दारी वृक्ष लागवड*


वार्ताहर/प्रतिनिधी
त्रिशरण एनलाईटमेंट फाउंडेशन पुणे द्वारा विकास दुत प्रकल्प आपल्या जिल्ह्यात सुरू झालेला असून या प्रकल्पा अंतर्गत *एक आठवण आपल्या दारी* हा उपक्रम ब्रम्हपुरी तालुक्यात *तुलनमेंढा ग्रामपंचायत* अंतर्गत *तुलानमाल* या गावात आज दिनांक 12/07/2021 रोज सोमवार ला जिल्हा समन्वयक *श्री. संदिप सुखदेवे सर* व ब्रम्हपुरी तालुका समन्वयक *श्री. विनल बंडेवार सर* यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यात कोरोना या आजाराने मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ *एक आठवण आपल्या दारी* या उपक्रमा अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या मध्ये *1) चंद्रभगत रामकृष्ण केसरी , 2) उमेश गोवर्धन सोंदरकर ,3) तुकाराम नानाजी बगळे ,4) केवळ धोंडू चहांदे, 5) रामभाऊ सिद्धार्थ वंजारी* यांच्या स्मरणार्थ त्यांच्या घर परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत , फळझाडे, फुलझाडे ,इतर आवश्यक झाडांची लागवड करण्यात आली. त्यावेळी प्रतिष्ठित नागरिक, कुटुंबातील सदस्य व ग्रामविकास दुत *श्री.तुळशीदास कार सर* उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular