Friday, April 19, 2024
Homeनागपुरबेधुम वेगाने चालणाऱ्या बाईकस्वारांमुळे गावकरी त्रस्त

बेधुम वेगाने चालणाऱ्या बाईकस्वारांमुळे गावकरी त्रस्त



पुंडलीक कामडी

सिर्सी: गावातून सध्या धूम स्टाईल मध्ये दुचाकी चालवणाऱ्या काही अती उत्साही तरुणांची संख्या वाढत आहे. अश्या प्रकारामुळे आमची मुले थोडक्यात बचावली असल्याच्या काही तक्रारी येथील गावकऱ्यांनी केलेल्या आहेत.


गावात प्रवेश करण्याकरिता एकच मुख्य मार्ग आहे. त्या रस्त्याने गावातील काही उपद्रवी तरुण दुसऱ्या लोकांच्या जीवाची पर्वा न करता अतिवेगाने आपली दुचाकी वाहने पळवीत असतात. रस्त्याच्या बाजूला लोकांची घरे आहेत. त्या घरासमोर लहान मुले खेळत असतात. अश्याच एका धूम स्टाईलने दुचाकी चालवणाऱ्या पासून माझा मुलगा थोडक्यात बचावला असे वरभे नामक एका व्यक्तीने सांगितले.
दुसऱ्या लोकांची पर्वा न करता फक्त हिरोगीरी दाखवणाऱ्या अश्या उपद्रवी कार्ट्यावर वचक बसविण्यासाठी येथील स्थानिक प्रशासनाने कडक पावले उचलायला पाहिजे असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular