Friday, March 29, 2024
Homeवर्धानवीन जलकुंभ सुरु झाल्याने हिंगनघाट शहरातील टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा

नवीन जलकुंभ सुरु झाल्याने हिंगनघाट शहरातील टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा

संत ज्ञानेश्वर वार्ड व तुकडोजी वार्डतील पानी समश्या कायम स्वरूपी निकाली तीन हजार कुटुबियाना मिळाला योजनेचा लाभ नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांचे हस्ते शुभारंभ

तालुका प्रतिनिधी
योगेंद्र वाघमारे
हिंगणघाट

हिंगनघाट शहरातील अमृत योजने अंतर्गत तीन जलकुंभ सुरु झाल्याने टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.या मुळे वर्षानुवर्ष पानी टंचाई असणाऱ्या संत तुकडोजी व ज्ञानेश्वर वार्ड मधील पानी समश्या कायम स्वरूपी निकालात निघाल्याने नागरिकाना मोठा दिलासा मिळाला आहे. हिंगनघाट शाहराकरिता अमृत योजने अंतर्गत ४२ कोटि रकमेची पानी पुरवठा योजना मंजूर झाली. यात शहरातील विविध भागात १० जलकुंभ व नवीन पाण्याचे पाईप लाइन चा समावेश आहे.

या योजनेचे काम आता अंतिम टप्पात असुन पहिल्या टप्पात असुन तुकडोजी वार्ड येथील ४.५० लाख लीटर पानी क्षमतेचा जलकुंभ , संत ज्ञानेश्वर वार्ड येथील पटवारी कॉलनी मधील ५ लाख लीटर क्षमतेचा जलकुंभ व टाका ग्राउंड मधील ६ लाख लीटर क्षमतेच्या जलकुंभा चे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी पाणीपुरवठा सभापती भास्कर ठवरी , माज़ी नगरसेवक प्रा किरण वैद्य ,नगरसेवक बंटी वाघमारे , पानी पुरवठा अभियंता दिनेश तपासे , विशाल ब्राम्हणकर. आदी उपस्तित होते. शहरातील विस्तारित झालेल्या तुकडोजी व ज्ञानेश्वर वार्ड मधील नवीन वसाहतीत अनेक भागात पाण्याची पाइप लाइन नसल्याने कुपनालिकेवर अवलंबून राहवे लागत असे. परंतु उन्हाळ्यात पानी पातळी खाली जात असल्याने तीव्र पानी टचाईचा नागरिकांना सामना करावा लागत.या भागातील नागरिकांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत.नगर पालिकेच्या वतीने गत तीन वर्षा पासुन टैंकर द्वारे पानी पुरवठा केल्या जातअसे. परंतु या भागात पाइप लाइन टाकल्याने आता नागरिकांना भर उन्हाळ्यात भरपूर पानी मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. तसेच गत काही वर्षापासून शहरातील विविध भागात कमी पानी पुरवठा होत असल्याची नागरिकांची ओरड होती . परंतु नगर पालिका प्रशासनाने यावर सुद्धा कायम स्वरूपी उपाय योजना केली आहे. तहसील जलकुंभा वर १०० एच. पी.चा नवीन पंप तसेच कॉटेज हॉस्पिटल व बिडकर वार्ड मधील जल कुंभावर प्रत्तेकी ५० एच. पी. चे नवीन मोटर पंप बसविन्यात आल्याने पूर्ण क्षमतेने हे तिनही जलकुंभ भरल्या जाणार आहे.त्यामुळे नागरिकाना नियमित पानी मिळणार आहे. साध्यस्तितित या परिसरातील नागरिकांना एक दिवसाआड़ पानी पुरवठा होत आहे.येत्या १५ दिवसात दर दिवशी नियमितपने व नियोजित वेळी नागरिकाना पानी मिळने शक्य होणार आहे.असे अभियंता तपासे यांनी सांगितले. तसेच मुख्य पंपिंग स्टेशन वर १५० एच. पी.चे चार मोटरपंप बसविन्यात आले असुन त्यापैकी दोन पंप नियमित कार्यान्वित राहणार आहे. त्यामुळे पंप नादुरुस्त झाल्यास उर्वरित दोन पंप लगेच कार्यान्वित होणार आहे. यामुळे नागरिकांना नियमित पानी पुरवठा होणार आहे. # ५० कोटि रकमेच्या बंधाऱ्याचा प्रस्ताव सादर – आमदार समीर कुणावार अमृत योजनेशी संलग्न असलेल्या वना नदी वरील ५० कोटी रकमेच्या बंधारा बांधकामाचा प्रस्ताव शासना कड़े प्रलंबित असुन सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.येत्या अधिवेशनात मंजूरी मिळने अपेक्षित आहे.सदर प्रस्तावित बंधारामुळे हिंगनघाट शहराला भविष्यात कधीच उन्हाळ्यात सुद्धा पानी टंचाई भेडसावनार नाही असे आमदार कुणावार यांनी सांगितले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular