Friday, April 26, 2024
Homeवर्धाट्रॅव्हल्स आणी ट्रेलरच्या धडकेत चालक गंभीर

ट्रॅव्हल्स आणी ट्रेलरच्या धडकेत चालक गंभीर

समुद्रपूर :-

राष्ट्रिय राज्य महामार्ग 44 जाम (चौरस्ता) येथे चंद्रपूर वरुन नागपुर कडे जाणाऱ्या ट्रेलरला हैद्राबाद वरुन नागपुरकडे जाणारी ट्रॅव्हल्स बस निष्काळजीने चौक पार करित असताना ट्रेलरला धडक दिली यात अपघातात ट्रॅव्हल्सचा चालक गंभीर जखमी झाला तर दोन प्रवासी घायल झाले.ही घटना 29 एप्रिलच्या रात्री11.30 वाजता दरम्यान जाम (चौरस्ता) येथे घडली.


आर जे 09 जिसी 3029 क्रमांकाचे ट्रेलर जाम (चौरस्ता)पार करित होता.त्याच वेळेस एम. एच. 31 एफ सी 5185 नागपूर कडे जाताना धडक दिली. त्यामुळे ट्रॅव्हल चालक नागपुर येथिल त्रिभुवन मनिकापुरेच्या पायाला गंभीर मार लागल्याने तसेच दोघाजनांना किरकोड मार लागलेले प्रवासांना जाम महामार्ग पोलिस केंद्राचे प्रमोद पाटिल, सुधाकर बावणे, गौरव खरवदे, शरद इगोले,राजेन्द्र बेले, भारत पिस्सुड़े,अजय बेले , सुनिल श्रीनाथे यानी गंभीर जखमी व किरकोड जखमीना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जाम ( चौरस्ता) येथिल मार्ग क्रेनद्वारे खुले केले.पुढील तपास समुद्रपूरचे थानेदार हेमंत चांदेवार यांचा मार्गदर्शनात करीत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular