Sunday, September 8, 2024
Homeवर्धाकेळझर येथे कामगारांना स्मार्ट कार्ड चे वितरण

केळझर येथे कामगारांना स्मार्ट कार्ड चे वितरण

सेलु:
कामगार कल्याण मंडळ,वर्धा तर्फे साई ऑन लाईन सेंटर,केळझर द्वारे कामगारांना आज सकाळी स्मार्ट कार्ड व कामोपयोगी भेटवस्तू देण्यात आली.


केळझर परिसरातील जवळपास १८० कामगारांचे स्मार्ट कार्ड तयार होवून आले आहे. स्मार्ट कार्ड सोबत साई ऑन लाईन सेंटरचे प्रमुख मनोज डाफे यांनी याप्रसंगी उपस्थित लाभार्थ्यांना आपले कडून भेटवस्तू दिल्या.


आज फरजाना पठाण,शगुफ्ता शेख,अशोक चौधरी या लाभार्थ्यांना जि.प.सदस्य विनोद लाखे, साई संघटनेचे अध्यक्ष किसना वाकडे,प्रभाकर नखाते, सुरेश भोयर व गणेश कापसे यांचे हस्ते स्मार्ट कार्ड प्रदान करण्यात आले. यामुळे कामगारांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

05/09/2024

03/09/2024

02/09/2024