Saturday, April 20, 2024
Homeभंडाराराष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत महाबीजकडून धान बियाणे अनुदानावर उपलब्ध

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत महाबीजकडून धान बियाणे अनुदानावर उपलब्ध

मोहाडी :
मोहाडी तालुक्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत महाबीजकडून धान बियाणे अनुदानावर उपलब्ध झाले आहेत. अनुदानावरील बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोहाडी येथून परमिट घेऊन जावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे यांनी केले आहे. शेतकऱ्यांसाठी परमिटसाठी सातबारा व आधार कार्ड सादर करायचे आहे. परमिट अधिकृत कृषी केंद्राकडे जमा करून बियाणांची उचल करावयाची आहे.


बियाण्यांचे अधिकृत कृषी केंद्र

  • राज कृषी केंद्र जांब यांच्याकडे सुवर्णा, पीकेव्ही एचएमटी, एमटीयू १००१, एमटीयू १०१९ व पीकेव्ही तिलक वाणाचे बियाणे उपलब्ध आहेत. भुजाडे कृषी केंद्र जांब यांच्याकडे एमटीयू १००१, एमटीयू १०१० वाणाचे बियाणे उपलब्ध आहेत. एन. एस. ढोमणे आणि कंपनी मोहाडी यांच्याकडे पीकेव्ही एचएमटी, एमटीयू १००१, एमटीयू १०१० वाणाचे बियाणे उपलब्ध आहेत. सुवर्णा वाणाचे बियाणे २५ किलोची बॅग ८५० रुपये, एमटीयू १०१० वाणाची २५ किलोची बॅग ७०० रुपये, एमटीयू १००१ वाणाची २५ किलोची बॅग ७५० रुपये, पीकेव्ही एचएमटी वाणाची २५ किलोची बॅग ९५० रुपये व पीकेव्ही तिलक वाणाची १० किलोची बॅग ३४० रुपयांमध्ये मिळणार आहे. अधिक माहितीसाठी मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधावा.
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular