Thursday, March 28, 2024
Homeभंडारामिनी मंत्रालय काबीज करण्याचा निर्धार

मिनी मंत्रालय काबीज करण्याचा निर्धार

वंचित बहुजन आघाडी चा कार्यकर्ता मेळावा संपन्न

भंडारा :-
येथील इंद्रलोक सभागृहामध्ये वंचित बहुजन आघाडी चा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्यात पक्षाची पुढील वाटचाल तसेच संघटन बांधणी च्या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री तथा वंचित चे पूर्व विदर्भ मुख्य संयोजक रमेशकुमार गजबे , उदघाटक म्हणून राज्य कार्यकारिणी सदस्य कुशल मेश्राम , पूर्व विदर्भ समन्वय समितीचे संयोजक राजू झोडे , मुरलीधर मेश्राम , राहुल वानखेडे , भगवान भोंडे , राजेश बोरकर , किशोर कैथल , प्रा.नान्हे , अजय सहारे , जिल्हाध्यक्ष सुरेश खंगार , जिल्हा महासचिव दिगाबर रामटेके उपस्थित होते.


सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले , राजर्षी शाहू महाराज , भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले व त्यानंतर पाहुण्यांचे स्वागताचे कार्यक्रम संपन्न झाले.माजी राज्यमंत्री रमेशकुमार गजबे यांनी आपल्या मार्गदर्शनातून जिल्हा कार्यकारिणी मध्ये फेरबदल तसेच विस्तार संबंधी सूचना दिल्या. तर समोर होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भात संघटन बांधणी बाबत कुशल मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. धारगाव क्षेत्रातील महिलांनी सामाजिक विषयावर प्रबोधनात्मक गीत सादर केले.
ह्यावेळी विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी जिल्हा कार्यकारिणी मध्ये काम करण्याची इच्छाशक्ती दाखवीत समन्वय समितीच्या सदस्यांना मुलाखती दिल्या.सदर मेळाव्याला जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी चे पक्षप्रमुख ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवीत पक्षप्रवेश केला. माजी राज्यमंत्री गजबे यांनी पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात पक्षाचे दुपट्टे व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. जिल्हयातील संघटन मजबूत करून स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्याचे निर्धार पक्षाने केले असल्याचे माजी राज्यमंत्री गजबे , पत्रकार परिषदेत बोलले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लाखनी तालुकाध्यक्ष दिपक जनबंधु , संचालन सुनीता टेंभुर्णे तसेच आभार पवनी तालुकाध्यक्ष संघदीप देशपांडे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा महासचिव , अमित वैद्य , धनपाल गडपायले , जिल्हा उपाध्यक्ष राधेश्याम कावळे , कार्तिक तिरपुडे , नरेंद्र बन्सोड ,अरविंद गोस्वामी , शहर अध्यक्ष सोमेन्द्र शहारे , मुस्तक पठाण , संघटक वालदेकर , कोषाध्यक्ष बालक गजभिये , नेहाल कांबळे , विजय रंगारी , तसेच जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular