Thursday, March 28, 2024
Homeभंडारामहर्षी विद्या मंदिर शाळेच्या स्थानांतरनास शासनाकडून स्थागणादेश

महर्षी विद्या मंदिर शाळेच्या स्थानांतरनास शासनाकडून स्थागणादेश

• सामाजिक कार्यकर्ता मधुकर देशमुख यांचे प्रयत्न सार्थकी • शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतली दखल
भंडारा :- एखाद्या शाळेचे स्थानांतर करण्यापूर्वी राज्य शासनाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असते. परवानगी न घेता परस्पर स्थानांतरण केल्यास शाळेची मान्यता आपोआप रद्द होते. असा नियम असला तरी महर्षी विद्या मंदिर बेला(भंडारा) येथून विना परवानगी ने , नियमबाह्य अशोक नगर(भंडारा) येथे स्थानांतरण केल्याने शाळेची मान्यता रद्द करावी. याकरिता सामाजिक कार्यकर्ता मधुकर देशमुख यांनी १४ जुलै २०२१ रोजी अवर सचिव प्रवीण मुंडे यांचेशी पत्र व्यवहार केल्याने महर्षी विद्या मंदिर शाळेच्या स्थानांतरनास स्थागणादेश दिल्याचे ११ ऑगस्ट २०२१ रोजी पत्र निर्गमित केल्याने सामाजिक कार्यकर्ता मधुकर देशमुख यांचे प्रयत्न सार्थकी लागले आहे.


महर्षी शिक्षण संस्था नवी दिल्ली द्वारा संचलित महर्षी विद्या मंदिर बेला(भंडारा) येथे नर्सरी पासून इयत्ता १२ वी पर्यंत वर्ग असून दर्जेदार शिक्षणामुळे शिक्षण क्षेत्रात ख्याती प्राप्त शाळा असल्यामुळे या ठिकाणी अंदाजे २ हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते. पण ही शाळा भाड्याचे इमारतीत सुरू असल्याने सोयी सुविधांचा अभाव होता. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तथा भौतिक सुविधा उपलब्ध करण्याचे हेतूने या शिक्षण संस्थेने २०१९ ला फुलमोगरा (भंडारा) येथे अद्ययावत शाळा इमारत तयार करून त्या ठिकाणी महर्षी विद्या मंदिर शाळेचे शासनाची पूर्व परवानगी न घेता स्थानांतरण केले. ही नियमबाह्य बाब असल्याचे मुख्याध्यापक श्रुती ओहोळे यांचे निदर्शनास आल्याने शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा चे वतीने शिक्षण उपसंचालक नागपूर यांचे मार्फत मे २०२१ ला पत्र क्रमांक ३०११ अन्वये महर्षी विद्या मंदिर शाळेचे स्थानांतरण कार्यान्वित करण्यासाठी शासनाशी पत्र व्यवहार केला.
याबाबद सामाजिक कार्यकर्ता मधुकर देशमुख यांना माहिती होताच महर्षी विद्या मंदिर शाळेची स्थानांतरण कारवाई रद्द करावी. याकरिता १४ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव प्रवीण मुंडे , शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव , शिक्षण संचालक पुणे , शिक्षण उपसंचालक नागपूर , जिल्हाधिकारी भंडारा व शिक्षणाधिकारी प्राथमिक , माध्यमिक जिल्हा परिषद भंडारा यांचेशी पत्रव्यवहार करून महर्षी विद्या मंदिर शाळेची वस्तुस्थिती उघडकीस आणली. याची शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दखल घेऊन ११ ऑगस्ट २०२१ चे पत्र क्रमांक माशास्था/३३२१/प्रक्र/४१८/एसएम-१ नुसार महर्षी विद्या मंदिर बेला(भंडारा) या शाळेच्या नियमबाह्य स्थानांतरणास स्थगिती दिल्याने सामाजिक कार्यकर्ता मधुकर देशमुख यांचे प्रयत्न सार्थकी लागल्याचे दिसून येते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular