Tuesday, May 14, 2024
Homeभंडाराअखेर घरकुल लाभार्थ्यांच्या रखडलेल्या निधीचा मार्ग मोकळा !

अखेर घरकुल लाभार्थ्यांच्या रखडलेल्या निधीचा मार्ग मोकळा !

१५ दिवसांत लाभार्थी सुखावणार ;कांग्रेस च्या मागणीवर नगराध्यक्षांचे स्षटीकरण
तुमसर :
घन कचरा व्यवस्थापनाचा मुद्दा घेवून तुमसर शहर काॅंग्रेसने सोमवारला नगर परिषद गाठले. निवेदनातून नगराध्यक्षांच्या दालनात आंदोलनाचा ईशाराही दिला. कांग्रेसच्या मागणीतील ठळक तिन मुंद्यांपैकी घनकचरा , नळाला येणारे गढूळ पाणी या मुद्दांसह घरकुल लाभार्थ्यांची व्यथाही एक महत्वाचा विषय त्यात नमुद करण्यात आलेला आहे. त्यावर नगराध्यक्ष प्रदिप पडोळे यांनी विषयानुरुप दिलेल्या स्पष्टीकरणातून समोर आलेल्या माहितीमुळें शहरातील तहबल झालेले घरकुल लाभार्थी सुखावले आहेत. त्यांच्या रखडलेल्या आर्थिक टप्प्याचा मार्गच मोकळा झाल्याचे नगराध्यक्षांनी आपल्या वक्तव्यातून स्पष्ट केले आहे. काॅंग्रेसच्या मागणीतील प्रत्येक मुद्दांवर पुराव्यासह स्पष्टीकरण देतांना पडोळे यांनी निवेदक नेत्यांना आपणही सध्या नागरीकांकरीता प्रयत्नशिल असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र इतर मुद्दांवर नगर परिषदेने लवकर नियोजन न केल्यास येत्या सोमवारला आंदोलन करण्याचा ईशारा काॅंग्रेसने दिला आहे. मात्र येत्या १५ दिवसांमध्ये घरकुल लाभार्थ्यांना त्यांची उर्वरीत रक्कम मिळणार असल्याची माहीती ही चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.


तुमसर शहरात मागील काही दिवसांचा राजकिय अलेख हा आरोप-प्रत्यारोपामध्ये रेखाटल्याची वास्तविकता कुणापासून लपलेली नाही. शहर एक-समस्या अनेक, यातून मार्ग काढण्याकरीता नगर परिषद प्रशासनही झटतांना दिसतच आहे. मात्र शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा मुद्दा कधी सामाजिक संस्थांनी तर कधी विविध राजकिय पक्षांनी धरुन ठेवला आहे. त्यात घरकुलचा मुद्दा अती गंभीर विषय ठरला आहे. याच धर्तीवर कांग्रेस पक्षाने सोमवारला निवेदनातून मागणी करतांना नगराध्यक्ष पडोळे यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ज्या मुद्दावर मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षाने आपली छाप सोडली त्याच मुद्दांवर कांग्रेसचे ते निवेदन जरा उशीरा धडकल्याची चर्चा होत आहे. कांग्रेससच्या निवेदनातून उचललेल्या घरकुलच्या विषयावर नगराध्यक्ष पडोळे यांनी स्पष्टीकरण सादर केले आहे.

मागणी विरुध्द स्पष्टीकरण अश्या चर्चेत नगराध्यक्षांनी घरकुलच्या रखडलेला निधी म्हाडा संचालनालय मुंबई येथून लवकरच प्राप्त होणार असल्याचे सांगितले आहे. शहरातील हतबल झालेल्या घरकुलच्या लाभार्थ्यांकरीता ती सुखद बातमी ठरणार आहे. पडोळेंच्या मते येत्या १५ दिवसांत घरकुलचा निधी राज्यस्तरावरून प्राप्त होणार आहे. त्यात लाभार्थ्यांच्या पहिल्या टप्प्याच्या देयकावरुन दुसरा टप्पा ठरवला जाणार आहे. त्यात लाभार्थीनिहाय ६०-८० हजार अशी रक्कम देय केली जाणार आहे. तर उर्वरीत प्रती लाभार्थी २० हजाराचा निधीही लवकरच प्राप्त होणार असल्याचे पडोळे यांनी कांग्रेसस नेत्यांना सांगितले आहे. सदरच्या बाबतीत आपण मुंबई दौरा नुकताच केला असून कोव्हिडच्या व्यवस्थापनेतून निधी प्राप्त होण्यास उशीर झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र घरकुल वगळता कांग्रेससने इतर मुद्दांवर नगराध्यक्षांचा घेराव केला त्यात काही दुमत नाही. घनकचरा व्यवस्थापनेच्या विषयावर तत्काळ नियोजनाकरीता संबंधित विभागाला बैठकीचे आदेश बजावून आपणही अॅक्शन मोडवर आल्याचे पडोळे यांनी यातून दाखवून दिले आहे. त्यात येत्या दिवसात समस्यांचे निवारण न झाल्यास कांग्रेसस आंदोलन पुकारणार हे मात्र नक्की!

स्टेटमेंट :

शहरातील घनकचरा,पीण्याच्या पाणी व घरकुल या प्रमुख समस्या मार्गी लागल्या आहेत. कचरा व्यवस्थापनाकरीता नविन निविदा काढली आहे. नकताच मुंबई दौरा करुन संबंधित विभागाला मी पाठपुरावा केला आहे. घरकुलचा रखडलेला निधी येत्या आठवड्याभरात लाभार्थ्यांना देय केला जाईल. कोरोनाचा विभागीय फटका गरीबांना नहाक सहन करावा लागला,याची मला मला कल्पना आहे,मात्र अखेर समस्या मार्गी लागल्याचे समाधानही आहे. : प्रदिप पडोळे, नगराध्यक्ष, नप तुमसर

स्टेटमेंट :
शहरी समस्यांनुरुप नगर पालिकेला निवेदनातून मागणी केली आहे. येत्या आठवडाभरात कांग्रेससच्या मागणीवर नियोजन न केल्यास शहरातील केर कचरा पालिकेच्या आवारात आणुन टाकणार व आंदोलनाचा बिगुल वाजविणार. :
प्रमोद तितिरमारे, प्रदेश सचिव, महाराष्ट्र कांग्रेस

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular