ठीक-ठिकाणी कचऱ्याचे डिगारे साचल्याने घंटागाड्या सुरू करण्याची होत आहे नागरिकांकडून मागणी
आर्वी : नगरपरिषदेच्या घंटागाड्या तीन दिवसापासून बंद असल्या कारणाने नागरिकांची जिकडे तिकडे बोंबाबोंब घंटागाड्या चक्क बंद असल्याने घरातच चार दिवसापासून पासून साचून ठेवा लागला कचरा समोर दिवाळीचे अनेकांच्या घरात साफसफाईचे काम सुरू आहे. अशातच घरातही किती दिवस कचरा साठवून ठेवणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
घरातही जास्त दिवस कचरा ठेऊ शकत नसल्याने
घरात कचरा ठेवून ठेवून कचऱ्याचा वास येत असल्याने घरातील कचरा बाहेर रस्त्यावर आणून टाकत आहे.
परिसरामध्ये कचऱ्याचे ठिक-ठिकाणी ढिगारे जमा झालेले आहे
रस्त्यावरील कचरा डुकरांनी अस्ताव्यस्त केला असून सर्व कचरा रोडवर पसरलेला आहे. जाणाऱ्या येणाऱ्यां नागरिकांना कचरा ओलांडून जावं लागत आहे.
अशा परिस्थितीत नगरपरिषदेणे लवकरात लवकर कचरा उचलून परिसर साफ करावा व घनकचऱ्याच्या घंटागाड्या सुरू कराव्या अशी मागणी वार्डातील नागरिक करीत आहे.
प्रतिक्रिया
तीन महिन्याचे साफसफाई व घंटागाडी कर्मचाऱ्यांची पगार झाले नसल्याकारणाने घंटागाड्या बंद होत्या आज दि. 12-10-2021 रोजी घंटागाडी व साफसफाई कर्मचाऱ्यांचे पगाराचे बिल तयार झाले आहे. उद्या पर्यंत पगार होऊन जाईल.
उद्याला दि.13-10-2021 रोजी सकाळी 10 वाजताच्या नंतर घंटागाड्या नियमितपणे सुरू होईल असे आरोग्य विभाग अधिकारी यांनी सांगितले.
*आरीकर साहेब*
आरोग्य विभाग अधिकारी