Friday, March 29, 2024
Homeवर्धानगरपालिका नगरसेवकांची स्थागणादेश साठी धाव

नगरपालिका नगरसेवकांची स्थागणादेश साठी धाव




न.प.च्या विकास कामांना अडथळा येऊ देणार नाही – नगराध्यक्षा सौ .तुमने
निवीदा प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप

सिंदी ( रेल्वे ) : सिंदी नगर परिषदेमध्ये ७ महिने अगोदर पुर्व नगराध्यक्षा सौ . संगीता शेडे यांना पायउतार करण्यात आले व नविन नगराध्यक्षा म्हणून श्रीमती बबीता तुमाने यांची वर्णी लागली . माजी नगराध्यक्षांच्या काळात त्यांचे सोबत राहून काही नगर सेवकांच्या प्रभागात कामे होऊ न देता स्वतःच्या प्रभागातील कामे मंजूर करून घेणाऱ्या नगरसेवकाचा कांगावा सुरू असून विकास कामे थांबविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहे . नगराध्यक्षा सौ . तुमाने यांनी आठ प्रभागातील कामे होण्यासाठी केलेल्या प्रयत्नात आता मात्र त्यावर नगर सेवक प्रकाशचंद्र डफ यांनी ३०८ दाखल करून विकास कामांना स्थगनादेश मिळण्यासाठी वरिष्ठांच्या मदतीने प्रयत्न सुरू केलेले आहे . निवडणूकीला अत्यल्प वेळ असतांना जास्तीत जास्त विकास कामांना प्रारंभ होण्यासाठी नगराध्यक्ष सौ . तुमाने यांनी पक्षाचे राजकारण न करता विकास कामांना गती देण्यासाठी आठही प्रभागातील विकास कामांना प्राधान्य देऊन मंजूर कामांचे भुमिपुजनाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली .

परंतू नगरसेवक प्रकाशचंद्र डफ यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे नानाविध आरोप दाखल करित ३०८ दाखल करून विकास कामांना स्थगनादेश मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला . मा . जिल्हाधिकारी यांनी यावर अद्याप निर्णय न घेतल्याने विकास कामे सुरू आहेत . उलट ह्याच नगरसेवक महाशयांनी व्हॉटअपचा आधार घेऊन नानाविध आरोप करून जनतेत सभ्रम निर्माण करीत आहे . स्थगनादेश अर्जामध्ये निवीदा मॅनेज केल्याचा आरोप केला परंतू या सर्व कामांचे अंदाजपत्रक सन २०२० च्या सी . एस . आर . शासकिय दराने तयार करण्यात आले होते व नविन सी.एस.आर. दरात सन २०२१ मध्ये १५ % दराने झालेली वाढ लक्षात घेता शासकिय निधीची बचत व यामुळे होणाऱ्या विकास कामांची कटोती व वाढीव दराने अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी महाराष्ट्र नगर परिषदा , नगर पंचायती व औद्यागीक नगरी अधिनियम १ ९ ६५ अंतर्गत सर्व प्रक्रिया मुख्याधिकारी यांचे अधिपत्याखाली पुर्ण करून टेंडर प्रक्रिया मंजूर करण्यात आली . व विकास कामांना सुरुवात झाली आणि सध्या अनेक विकास कामांना झालेली सुरुवात पाहता नाल्या , रस्त्ये , खोदकाम व बांधकामाचे साहित्य जागोजागी पडले असल्याने लवकरात लवकर विकास कामे पूर्ण होण्यासाठी न.प. प्रशासन प्रयत्न करीत आहे . परंतु नगरसेवक प्रकाशचंद्र डफ या कामांना स्थगनादेश मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे . अश्या परिस्थितीत स्थगनादेश मिळाल्यास अनेक रस्ते बंद होऊन नगरवासियांच्या अडचणी वाढल्या असत्या , पर्यायाने न.प. प्रशासनाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले असते . नगराध्यक्ष सौ . बबिता तुमाने यांना मिळालेल्या ७ महिन्यांच्या कार्यकाळात गावातील अनेक विकासात्मक प्रलंबित कामांना गती दिल्याने अत्याधुनिक व्यायामशाळा , शालेय विद्यार्थी व गावातील तरुणांसाठी स्पर्धा परिक्षेकरीता अभ्यासिका सुरू करणे , व्यायामासाठी ग्रिनजीम , लहान मुलांचे खेळणे , नगर परिषद शॉपिंग सेंटरचा भाडेवाढीचा मागील ११ वर्षापासूनचा प्रलंबीत प्रश्न नुकताच सभागृहाच्या माध्यमाने निकाली काढला . घरकुल संबंधी बैठकांची आयोजन करून लाभार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यास गती देण्याच्या कामाला हाताळले व नविन घरकुल देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली , गुंठेवारी नियमाप्रमाणे वाघमारे कॉलनीतील २० वर्षापासून प्रलंबीत प्रकरण निकाली काढण्यासाठी शासकीय नियमाने सरकारी प्रक्रिया सुरु केली. आदी या संपूर्ण महत्वपूर्ण विषयांमध्ये नगरसेवक प्रकाशचंद्र डफ यांनी विरोध दर्शवून अडचण आणण्याचा प्रयत्न केला आहे . परंतू विकास कामांना न्याय देऊन पुर्णत्वास नेण्याच्या नगराध्यक्षांच्या प्रयत्नांना १५ नगरसेवकांचा पाठींबा आहे त्यामुळे हे कार्य पूर्णत्वास जाईलच असा त्यांचा दृढ विश्वसा आहे . न.प. प्रशासनाची गोची करणाऱ्या व व्हॉटअपच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करणाऱ्या नगरसेवकाला जनता उत्तर देईल यात शंका नाही . नगरसेवक प्रकाशचंद्र डफ यांचे अवैद्य लेआऊट रद्द करण्याचा आलेला नगर रचनाकार विभाग वर्धा यांचे पत्रावर झालेल्या निर्णयाचा तसेच नगर परिषदेच्या प्लॉटवर त्यांनी केलेले अतिक्रमण यामुळे कदाचित हा विरोध असावा परंतू न . प . प्रशासन नियमाप्रमाणे योग्यती कार्यवाही करेल यात शंका नाही .

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular