शिवणफळ शेतशिवारातील घटना,
दोन वर्षांपासून तक्रारी धुळखात
समुद्रपूर :

शिवणफळ शिवारातील शेतपंपाला जोडणी दिलेला विद्युत खांब पूर्णतः जमीनदोस्त झाल्याने कधीही अनुचित प्रकार घडू शकते. त्यामुळे विद्युत खांब जमिनीवर कधी कोसळेल याचा नेम नाही. याविषयी शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीला वारंवार तक्रारी दिल्या. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
शिवणफळ येथील शेतकरी वासुदेव पोटे यांच्या शेतात विद्युत खांब पूर्णतः वाकलेला आहे. तर एका खांबाच्या तारा जमिनीवर तुटून पडल्याने केंव्हाही अनुचित घटना घडू शकते. या विषयी तोंडी आणि लेखी तक्रार अर्ज केल्यावर विद्युत महावितरण कंपनीकडून माणसं उपलब्ध होत नसल्याचे कारण सांगितल्या जातं आहे.शिवाय महिला शेतकरी पुष्पाबाई उमाटे यांच्या शेतातील विद्युत खांबाच्या तारा जमिनीवर पडल्या आहे. त्यामुळे या ताराजवळ मोकाट जनावरे कधी जाईल याचा नेम नाही तर जिवंत विद्युत तारामुळे अनुचित प्रकार घडू शकतो. तातडीने विद्युत खांब उभा करण्यात यावा. लोंबलेल्या तारा सुरळीत करण्यात याव्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे