Tuesday, March 19, 2024
Homeचंद्रपुरआंतराष्ट्रीय कराटे स्पर्धेत, ब्रह्मपुरी कराटे असोसिएशनचे विद्यार्थी चमकले

आंतराष्ट्रीय कराटे स्पर्धेत, ब्रह्मपुरी कराटे असोसिएशनचे विद्यार्थी चमकले

ब्रम्हपुरीचा नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा उंचावला

ब्रह्मपुरी
नेपाळ (काठमांडू) येथे नुकतीच २३ मे ते २६ मे २०२२ रोजी, आंतराष्ट्रीय कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. इंटरनॅशनल ट्रॅडिशनल शितो रियु कराटे असोसिएशन (इंडिया) अंतर्गत ब्रह्मपुरी कराटे असोसिएशनच्या सर्व स्पर्धकांनी बहुतांश वयोगटात सर्वोत्तम कामगिरी करत घवघवीत यश प्राप्त केले आहे.

सदर स्पर्धेमध्ये जगातील विविध ७ देशांच्या चमूने सहभाग नोंदविला होता. ह्या मध्ये विशेषतः आपल्या भारतातील महाराष्ट्र राज्यातून ब्रम्हपुरी कराटे असोसिएशन अंतर्गत येत असलेल्या वडसा, वरोरा, नागपूर, वर्धा हिंगणघाट च्या ७२ विध्यार्थ्यांनी आंतराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भाग घेतले होते. सर्वात जास्त पदक घेणारी चमू म्हणून, ब्रम्हपुरी कराटे असोसिएशनला सर्वोत्तम चषकचा मानकरी ठरविण्यात आले. ह्यामध्ये १५ सुवर्ण पदक, २२ रजत पदक तर १६ कांस्य पदक पटकाविले..

हे सर्व स्पर्धक, ब्रम्हपुरी कराटे असोसिएशनचे मुख्य प्रशिक्षक शिहान-गणेश लांजेवार यांच्या मार्गदर्शनामध्ये सहभागी झाले होते. मागील कित्येक वर्षांपासून ब्रम्हपुरीचे खेळाडू आंतराष्ट्रीय स्तरावर ब्रह्मपुरी नाव उज्वल करीत आहेत, मग त्यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन स्पर्धा असो की असोसिएशन मार्फत कोणतेही खेळ असोत, नेहमी वर्चस्व फक्त ब्रम्हपुरीची चमू गाजवत असतो. या सर्व स्पर्धकांनी आपल्या सर्वोत्तम कामगिरीचे श्रेय प्रशिक्षक सिहान-शेख दत्तू, सिहान-कृष्णा ठोबाळे, सिहान-गणेश लांजेवार, सेन्सेई रवी चारुरकर, सेन्सेई सुधीर रिंके, सेन्सेई- नागेश रामटेके, दिलीप कंठाने याना दिले. तसेच चंद्रपूर जिल्हा आष्टेडू मर्दाणी आखाडा असोसिएशनचे अध्यक्ष श्री.गणेश तर्वेकर सर, आणि अड्याळ टेकडीचे संचालक आदरणीय श्री. सुबोध दादा, व युवा समाजसेवक श्री. उदयकुमार पगाडे, तसेच ब्रह्मपुरी कराटे असोसिएशन, चंद्रपुर जिल्हा आष्टेडू मर्दानी आखाडा असोसिएशन व लाईफ फाऊंडेशन संस्था, ब्रम्हपुरी ह्या सर्व संघटनेनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले..

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular