Saturday, July 27, 2024
Homeवर्धागॅप इन्क अर्थ संचालित केयर इंडियाची सेलू येथे इंटरफेस मिटिंग पार

गॅप इन्क अर्थ संचालित केयर इंडियाची सेलू येथे इंटरफेस मिटिंग पार

महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचा ध्यास – अमित टेभूंने

सेलू :

गॅप इन्क च्या अर्थसहाय्याने आणि करण्याच्या माध्यमातून महिला व पाणी प्रकल्पांतर्गत सेलू तालुक्यातील प्रेस विजेत्या महिला व पुरुषांचा सत्कार करण्यात आला तसेच इंटरफेस ची बैठक ही येथील शिवपार्वती सभागृह येथे पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केअर’चे अमित टेभूंने तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सेलू पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक सुरेंद्र कोल्हे तसेच उमेद प्रकल्पाचे तालुका समन्वयक हेमंत काकडे तसेच समुपदेशिका नीता बोरकर केयर इंडियाचे क्षेत्र समन्वयक मारुती लोहाट योगेश ढोक अतुल कातरकर आणि सर्व ट्रेनर उपस्थित होते यावेळी प्रकल्पाची माहिती देताना केअर इंडियाचे अमित टेभूंने यांनी केअर इंडिया ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करीत असून आरोग्य उपजीविका शिक्षण व आपत्ती व्यवस्थापन अशा मुख्य घटकावर आधारित संस्थेचे काम असल्याचे सांगितले शिवाय उपस्थित मान्यवरांनीही बैठकीत विचार व्यक्त केले या कार्यक्रमात प्रेस विजेत्या महिला आणि पुरुषांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसे प्रेस प्रशिक्षण घेतलेल्या महिलानी व पुरुषांनी आपले मनोगत व्यक्त केले संचालन कल्पना खोबे यांनी केले तर आभार प्रदर्शन माधुरी इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर उडान,चंद्रकांत भोंगडे, अस्मिता चौधरी, मेघा ढगे, अरुण मसराम,प्रमोद काळपांडे आदींनी प्रयत्न केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -

Most Popular