कृषी महाविद्यालय उमरखेड चे प्राचार्य श्री.एस .के. चींताले विषेतज्ञ व मृदाशास्त्र विभागाच्या साहाय्यक प्राध्यापिका सौ. सोळंके, प्राध्यापक वाकोडे व ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक रवी सपकाळ यांच्या मार्गदर्शना खाली
कृषिकन्या गौरी जामोदे हिने केले शेतकऱ्यांना माती परीक्षण मार्गदर्शन, दारव्हा तालुक्यातील गौळ पेंड शेती शिवारात माती परीक्षणाचा विशेष प्रकल्प राबविला या वेळी
कृषिकन्या कु. गौरी राजू जामोदे हिने श्री.संजय इंझाळकर यांच्या शेतात जाऊन माती परिक्षणाचे प्रात्यक्षित करून दाखवले.
जमिनीची सुपिकता जपण्यासाठी सातत्याने माती परीक्षण केले पाहिजे असे मार्गदर्शन करण्यात आले.माती परीक्षणातुन नत्र,स्पुरद, पलाश,सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीचा सामू, विद्राव्य क्षारांचे प्रमाण आधीची माहिती या परिक्षणातून मिळाल्याने पीक लागवड सोपी होते. अशी माहिती यावेळी देण्यात आली. माती परीक्षण करताना जमिनीचा उंच सखलपणा लक्षात घेऊन ,वेगवेगळे भाग पाळून ५ ते १८ नमुने घ्यावेत . त्यासाठी २० सेमी खड्डा करावा व कापडी पिशवीत माती प्रयोगशाळेत पाठवावी . असे आव्हाहन करण्यात आले.