अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
सावनेर:-30 नोव्हेंबर 2021
भालेराव हायस्कूल सावनेर विद्यालयातील विद्यार्थी करत आहेत मिरची,वांगी आणि टोमॅटो या पिकांची आधुनिक पद्धतीने लागवड.

सावनेर येथील विद्यार्थ्यांनी नुकतीच फाली (फ्युचर अग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया) या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या शेडनेटमध्ये वांगी टोमॅटो आणि मिरची या पिकांची आधुनिक पद्धतीने लागवड केली.
फाली ही संस्था विद्यालयामध्ये 2016 पासून कार्यान्वित आहे. या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना कृषि विषयी परस्परसंवादी शिक्षण, विविध प्रकारची प्रात्यक्षिके, क्षेत्रभेटी या माध्यमातून कृषी चे ज्ञान दिले जाते. हा उपक्रम भारतातील जैन इरिगेशन, गोदरेज एग्रोवेट, बायर, यूपीएल आणि स्टार ऍग्री या कंपन्यांच्या सहायातून महाराष्ट्र आणि गुजरातमधील 135 शाळांमध्ये राबवला जातो.
आताचा विद्यार्थी भविष्यात कृषी व्यवसाय व आधुनिक शेतीकडे वळावा हेच प्रकल्पाची मुख्य ध्येय आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कृषी शास्त्र, पशु शास्त्र, कृषी अभियांत्रिकी, अन्नशास्त्र व कृषी व्यवसाय व्यवस्थापन इत्यादींचा अभ्यास करतात. तसेच कृषी तज्ञांच्या व्याख्यानमाला व चित्रफितीच्या माध्यमातून मार्गदर्शनही केले जाते.
दरवर्षी जैन इरिगेशनच्या जळगाव येथे विद्यार्थ्यांची वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले जाते या स्नेहसंमेलनात मध्ये विद्यार्थी व्यवसाय नियोजन स्पर्धा तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धा यामध्ये भाग घेत असतात.
फाली चे अध्यक्ष श्री नादीर गोदरेज यांच्या मते,शेतक-यांच्या मुलांना विज्ञान,वैज्ञानिक शेती आणि व्यावहारिक ज्ञान,उद्योग भेटी,प्रशिक्षणार्थी या विषयांचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम या कार्यक्रमाचा भाग आहे.वार्षिक संमेलनात विद्यार्थी उत्कृष्ट प्रकल्प सादर करतात.इथे विद्यार्थ्यांना भविष्यात शेतीसाठी तयार केले जाईल.तसेच त्या बाबतीत कोणत्याही सहायक किंवा इतर ग्रामीण नोकऱ्यासाठी सुद्धा तयार केले जाईल.
शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी मुख्याध्यापक श्री.पहाडे सर नेहमी तत्पर असतात त्याचप्रमाणे कृषी शिक्षक श्री.अजेश पवार व शाळेतील सर्व सहकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभते.