Thursday, April 18, 2024
Homeभंडाराएसटीचे संपकरी कामगार मागणीवर ठाम

एसटीचे संपकरी कामगार मागणीवर ठाम

गोंदिया,
राज्य शासनाने एसटी कामगारांच्या काही मागण्या मान्य केल्या आहे. मात्र, संपकरी कामगार आपल्या मागण्यावर ठाम असून गोंदिया आगारातील एकही चालक, वाहन कामावर परतलेला नाही. आज 29 नोव्हेंबर रोजी निलंबीत करण्यात आलेल्या भंडारा विभागातंर्गत सहा आगाराच्या 27 संपकर्‍यांसह आतापर्यंत 179 जणांचे निलंबन झाले आहे. तर 86 अस्थायी कर्मचार्‍यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे.


राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचार्‍यांनी 31 ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. निलंबन व सेवा समाप्तीची कारवाई झाल्यानंतर तसेच वारंवार चर्चा करुनही तोडगा निघत नसल्याने शासनाने संपकरी कामगारांच्या परिवहन मंत्र्यांनी कामगाराच्या पगारात भरगच्छ वाढ देऊनही कर्मचारी विलनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. एसटी कामगारांच्या संपामुळे प्रवाशांचा खोळंबा झालाय. प्रवासाची कोंडी वाढली आहे. राज्यातील काही आगारातील कर्मचारी आज कामावर परतले, काही भागात एसटीच्या फेर्‍या चालल्या. मात्र गोंदिया आगारातील कोणताच चालक-वाहक आजही कामावर परलेला नाही. कार्यालयील अधिकारी, कर्मचारी वगळता सर्व 270 चालक-वाहक संपावर आहेत. आजपर्यंत गोंदिया आगारातील 11 कामगारांचे निलंबन तर 19 कामगारांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. भंडारा विभागात आतापर्यंत 179 कामगारांना निलंबीत तर 86 जणांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. तर आज, 29 नोव्हेंबर रोजी तिरोडा आगारातील 1, भंडारा 11, साकोली 9 व पवनी आगारातील 6 अशा 27 कामगारांना निलंबीत करण्यात आले. असे असतानाही कामगारांनी संप सुरुच ठेवला आहे. यामुळे मात्र प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
***20 कोटीपेक्षा जास्त नुकसान
गोंदिया आगारातील सर्व वाहन व चालक संपावर असल्याने आगारातून सुटणार्‍या सर्वच फेर्‍या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मागील 29 दिवसात आगाराचे 20 कोटीपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक संजना पटले यांनी दिली.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular