Tuesday, June 18, 2024
Homeभंडाराभरधाव वाहनाचा पाठलाग करून सहाशे किलो गांजा पकडला

भरधाव वाहनाचा पाठलाग करून सहाशे किलो गांजा पकडला

भंडारा,
भंडारा पोलिसांनी पीकअप वाहनाचा पाठलाग करून अडवित वाहनातून 632 किलो गांजा जप्त केला आहे. सदर कारवाई वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे रात्रीच्या गस्तीदरम्यान मुजबी गावाजवळ करण्यात आली.
वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी कदम हे आपल्या पथकासह शनिवारी रात्री गस्तीवर होते. दरम्यान पहाटेच्या सुमारास ते बेला गावाजवळ असताना बोलोरो पीकअप गाडी क्रमांक ओडी 05/एडब्लू 9092 ही राष्ट्रीय महामार्गावरील भंडारामार्गे नागपूरच्या दिशेने संशयास्पद स्थितीत भरधाव वेगाने जाताना दिसली. वाहनावर संशय आल्याने कदम यांना त्यांच्या वाहन चालकाला सदर बोलोरो पिअकप गाडीचा पाठलाग करण्याचे निर्देश दिले. पोलिसांचे वाहन पाठलाग करीत असल्याचे दिसताच पीकअपचा वेग अधिकच वाढला. त्यामुळे संशय अधिक बळावल्याने पोलिसांनीही वेगाने पाठलाग करून मुजबी गावाजवळ पीकअपला ओव्हरटेक करून अडविण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक कदम हे त्यांच्या पथकासह गाडीतून खाली उतरताच पीकअपचालकाने वाहनसोडून फरार झाला. यावेळी सदर वाहनाची तपासणी केली असतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला.


याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, भंडाèयाचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण सुभाष बारसे हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन भंडारा पोलिस ठाण्यात आणले. यावेळी वाहनात सुमारे 17 बो-यांमध्ये जवळपास 632 किलो 382 ग्रॅम गांजा असल्याचे उघड झाले. सदर गांज्याची किंमत 63 लाख 23 हजार 820 रुपये असल्याचे समजते. या कारवाईत गांजा व वाहनासह 68 लाख 39 हजार 190 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जगणे करीत आहेत.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular