सहकार्याच्या अपेक्षेतून राजकीय मुजोरी ; सलून दुकानात पोलिसांसमक्ष तोडफोड
बाय लाईन, अमित रंगारी
तुमसर :
लखिमपुर खेरी येथील शेतकरी नरसंहार निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने राज्यव्यापी बंद पुकारण्याची घोषणा केली खरी, मात्र त्याकरिता तुमसर शहर वासियांच्या सहकार्याच्या अपेक्षेतून ११ ऑक्टोंबरच्या दिवशी चक्क सत्तपक्षाच्या राजकीय मुजोरीचे चित्र पाहावयास मिळाले आहे. स्थानिकांचे नुकसान करून एका पिडीत समुदायाच्या हक्काचा लढा कसा साध्य केला जाऊ शकतो. अशी चिघडलेली परिस्थिती तुमसर शहरात महविकस आघाडी सरकारने पुकारलेल्या बंदच्या दिवशी दिसून अळी आहे. शहरातील एका सलून दुकानात चक्क सत्तापक्षानेच पोलिसांसमक्ष तोडफोड करून व्यावसायिकांचे नुकसान केल्याचे समोर आले आहे. त्या कृत्यामुळे बंदच्या नादात जनसामान्यांचे नुकसान करणारी ही महविकास आघाडी सरकार नागरिकांमध्ये संतापचर्चेचे विषय ठरली आहे. त्यात दुकानाची तोडफोड करणाऱ्या आमदार राजू कारेमोरे यांच्या सह इतर मित्र्पक्षाच्या जमावाविरुद्ध संबंधित दुकानदार कारवाहीची कायदेशीर कास धरणार असल्याचे कळले आहे.
उत्तर प्रदेशाच्या लखिमपुर खेरी येथील आंदोलनार्थी शेतकरी समूहाचा झालेल्या नरसंहारावर राज्याच्या महाविकस आघाडी सरकारने ११ ऑक्टोंबरला बंद पुकारले होते. त्यातूनच तुमसर शहरात विधानसभेचे आमदार राजू कारेमोरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस तथा शिवसेने मार्फत मोर्चा काढण्यात आलेले होता. सदर बंद हे राजकीय स्तरावरील असल्याने नागरी स्तरावरील स्वय सहकार्य हेच महत्त्वाचे ठरते. मात्र बंदचा पुकारा करणाऱ्या राजकीय गर्दीने तुमसरच्या नवीन बस स्थानक नजीकच्या साई आराध्या हेअर सलून दुकानात तोडफोड केली. दरम्यान बंदचे समर्थक आमदार, त्यांचे इतर सहकारी नेते आणि त्या दुकान मलकात पोलिसांसमक्ष चांगलाच राडा रंगला होता. दुकानात ग्राहक असल्याने शटर ओढण्याकरिता दुकानदाराने दोन मिनिटांचे वेळ मागितले. मात्र भारतीय जनता पक्षाचा समर्थक असल्याचा आरोप करून आमदार तथा उपस्थिती राजकीय गर्दीने बुधे यांच्या दुकानाची अक्षरशः तोडफोड केली. दुकानाचे दर्शनी भागावरील काच फोडून गर्दीने उपस्थित पोलिसांवरही राजकीय रौब दाखविण्याचा येथे प्रयत्न केल्याची चर्चा सध्या शहरात गरम आहे.
राजकीय बंद हे स्थानिकांच्या सहकार्यावर अवलंबून असते. त्यात एखादा बंद करीता व्यापारी अथवा स्थानिकांवर जोर-जबरदस्ती करता येत नाही, तसे नियमही आहे. मात्र, येथे सत्तापक्षाच एका पिडीत समूहाच्या न्यायाकरीता आपल्या स्थानिक नागरिकांच्या नुकसानास जबाबदार ठरली आहे. त्यात कायदा व सुव्यवस्था सांभाळणारी पोलीस यंत्रणाही त्या राजकीय गर्डीपुढे हतबल झाल्यागत दिसून आली. त्यात नुकसान झालेल्या व्यावसायिकाने आमदार तथा एका इतर जमावाविरुध्द पोलीस तक्रार करणार असल्याची माहिती दै विदर्भ कल्याणशी बोलतांना दिली आहे. त्या करीता पुरावा म्हणून आपल्या दुकानातील सीसीटीव्हीत कैद झालेल्या चित्रफितीचा आधार दुकान मालक बूधे घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
**शहरात चर्चेच्या केंद्रस्थानी आमदार कारेमोरे
- ज्या सलून दुकानात राजकीय बंदच्या नादात जमावाने आमदारांसमक्ष तोडफोड केली,त्यात कारेमोरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. लखिमपुर खेरी येथील पिडीत शेतकरी यांना न्याय देण्याच्या नादात आपल्याच मतदार क्षेत्रातील व्यावसायिकाचे नुकसान करणारे कारेमोरे हे एकमेव आमदार झाल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे. त्याच रोषांतून कामदारांचे ते कृत्य अशोभनीय ठरले असून ते आता कुचर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यातच मोर्च्याची गर्दी समोर जाताच सर्व व्यापाऱ्यांनी आपली बंद दुकाने उघडुन महा विकास आघाडीचा निषेध केला, हे ही तितकेच खरे!