चिरीमिरी घेतल्याशिवाय घरकुलाची कामे होत नाही
• ग्रामीण गृह निर्माण अभियंत्याचा अफलातून कारभार • गरीब घरकुल धारकांची लूट
लाखनी :
येथील पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील घरकुलाचे काम सांभाळणारे ग्रामीण गृह निर्माण अभियंता लाच दिल्याशिवाय जियो ट्यागिंग आणि घरकुलाची बिलिंग करीत नसल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला असून या प्रकाराने गरीब घरकुल धारकांची लूट होत आहे.

ग्रामीण भागातील मोडकळीस आलेल्या व पडक्या घरात वास्तव्यास असलेल्या आणि भाड्याच्या घरात राहणाऱ्या लाभार्थ्यासाठी घरकुल योजना चालविली जाते. घरकुलाचे अंदाजपत्रकिय रक्कम १.५० लाख रुपये असून प्रथम अग्रिम २० हजार त्यानंतर २ टप्यात प्रत्येकी ४५ हजार आणि अंतिम २० हजार रुपये असे देयकाचे स्वरूप असते.
लाखनी पंचायत समिती च्या बांधकाम विभागात ११ कंत्राटी ग्रामीण गृह निर्माण अभियंत्याची नेमणूक करण्यात आली असून त्यांना गावांचे वाटप करण्यात आले आहे. या अभियंत्याकडून घरकुलाच्या नियोजित जागेचे जियो ट्यागींग करणे त्यानंतर पायवा बांधकामाचे नंतर सज्जा बांधकाम त्यानंतर स्लॅब बांधकामाचे जियो ट्यागिंग व देयके तयार करण्याचे काम ग्रामीण गृह निर्माण अभियंत्याचे असते. हे अभियंते ज्या घरकुल धारकांनी लाच दिली त्यांचीच कामे करतात. बाकी लोकांना देयकासाठी ताटकळत राहावे लागते. त्यामुळे लाच दिल्याशिवाय ग्रामीण गृह निर्माण अभियांत्याकडून घरकुलाच्या देयाकाचे काम केले जात नसल्याचा आरोप लाभार्थ्याकडून होत असून गट विकास अधिकारी यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष पुरविणे गरजेचे झाले आहे.
** अभियंता म्हणतो कार्यालयात येणे जरुरी नाही (चौकट)
रेंगेपार/कोहळी , धाबेटेकडी , शिवणी , मोगरा , डोंगरगाव/साक्षर , मिरेगाव , खैरी या गावांसाठी ग्रामीण गृह निर्माण अभियंता डी. आर. भालाधरे यांची कंत्राटी तत्वावर नेमणूक करण्यात आली आहे. त्यांची मागील आठवड्यात परीक्षा असल्यामुळे ते आठवडाभर अनुपस्थित होते. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांना आल्या पावली परत जावे लागले. याबाबद एका लाभार्थ्यांने विचारणा केली असता कार्यालयात येणे जरुरी नसल्याचे उर्मट पणाने या गृह निर्माण अभियंत्याने सांगितले.
** प्रतिक्रीया/स्टेटमेंट(चौकट)
ग्रामीण गृह निर्माण अभियंते घरकुल धारकांकडून देवाणघेवानीच्या घटना वाढत आहेत. याबाबद बीडीओ
साहेबांशी चर्चा करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
राजेंद्र कानडे अभियांत्रिकी सहाय्यक प. स. लाखनी