Saturday, April 20, 2024
Homeभंडाराराज्यपाल ओबीसी आरक्षणाचा वटहुकूम अडवितात हे अत्यंत दुर्दैवी : आ. नरेंद्र भोन्डेकर

राज्यपाल ओबीसी आरक्षणाचा वटहुकूम अडवितात हे अत्यंत दुर्दैवी : आ. नरेंद्र भोन्डेकर

भंडारा :
राज्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकां आधी निर्माण झालेला ओबीसी आरक्षणा चा तिढा सुटावायासाठी महाविकास आघाडी सरकारकडून वटहुकूम काढण्यात आला . मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपली अडवणुकीची भूमिका कायम ठेवत या वटहुकूमावर आठवडा उलटला तरी स्वाक्षरी केलेली नाही . सहीसाठी आडमुठी भूमि का घेणाऱया राज्यपालां मुळे ओबीसीं च्या राजकीय आरक्षणा चा प्रश्न सुटण्याऐवजी गुंताअधि कचवाढला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसीं च्या राजकीय आरक्षणावर गदा आली. हा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय तसेच ओबीसी संघटनांची बैठक घेतली. त्यावर योग्य तोडगा काढण्याबा बत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सह सर्वांचेच एकमत झाले. त्या नुसार आगा मी जिल्हा परिषदा , पंचायत समिती च्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमी वर वटहुकूम काढण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने कायदेशीर सल्ला ही घेण्यात आला होता निर्णयावरही राज्यपालांची अद्याप स्वाक्षरी झालेली नाही उलट प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे कारण समोर केले हे अत्यंत दुर्दैवी आहे.

  • भाजप ओबीसीं विरोधी नीती मुळे राजकीय आरक्षण धोक्यात
    भारतीय जनता पक्षा मुळेच राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण धोक्यात आले असल्या चा पुनरुच्चार आमदार भोन्डेकर यांनी केला . राज्य सरकारने ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी मध्ये राजकीय आरक्षणा चा लाभ मिळावा , हे उद्धिष्ठ समोर ठेऊन अध्यादेश काढला. राज्य सरकारने कायदेशीर सल्ला घेऊनच वटहुकूम काढला असताना राज्यपाल कोश्यारी यांनी मात्र आरक्षणा चा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना ओबसीं संदर्भातील अध्यादेश कसा काढला, असा सवाल केल्या चे समजते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्याचे नमूदकरीत राज्यपालांनी सरका रकडून आणखी कायदेशीर मत मागवले आहे. 15 सप्टेंबप्टेंरच्या बैठकीत अध्यादेशा चा निर्णय ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ा वरून राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. त्या सर्वोच्च न्यायालयाच्या च्या निर्णया नंतर राज्य निवडणूक आयोगा ने राज्यातील 5 जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि एक जिल्हा परिषद पोटनिवडणूक जाहीर केली आहे. ५ ऑक्टोबर रोजी या निवडणुकी साठी मतदान होणार आहेत परंतु राज्यपाल भाजपच्या इसारा वर काम करीत असून त्याचा फटका ओबीसी समाजाला बसत आहे याची चिंता दैनिक विदर्भ कल्याण सोबत चर्चा करतांना भंडारा चे आमदार नरेंद्र भोन्डेकर करतांना त्यांनी व्यक्त केली.
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular