मोहन पंचभाईच्या नेतृत्वात ३ तास वाहतूक ठप्प
पवनी/प्रतिनिधी
निलज-पवनी-कारधा राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होत असून यामुळे शेतकरी व प्रवाशांच्या डोकेदुखीची वास्तविकता बांधकाम यंत्रणेला होण्यासाठी कांग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात जवाहर गेट पवनी समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान जनतेनी प्रचंड प्रतिसाद दिल्याने सदर मार्गावरील वाहतूक ३ तास ठप्प राहिली.

मागील तीन वर्षांपासून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग चौपद्रीकरण्याच्या हेतूने निलज-कारधा महामार्गाचे सिमेंट्रीकरण सुरू आहे. बांधकामाची मुदत संपली असतांना देखील बांधकाम यंत्रणेने काम पूर्ण केले नाही. मुदत वाढविली असताना बांधकाम धीम्या गतीने होत असून निकृष्ठ दर्जाच्या साहित्याचा वापर होत असल्याचे वास्तव आहे. अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उठविल्या जात असल्याने त्याची चौकशी करण्यात यावी. गावाचे व शेतकऱ्यांच्या शेतात जाणारे पोचमार्ग तथा पाण्याचे मार्ग रस्त्यात हरविल्याने ते तत्काळ बनविण्यात यावे, बांधकाम करतांना यंत्रणेच्या चुकीच्या धोरणामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे बांधकाम एजन्सीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा, रस्ता बांधकामात गौण खनिजांचे उत्खनन करतांना अवैधरित्या मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आला. परीणामी शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडाला असल्याने मोजमाप करून बांधकाम यंत्रणेवर कारवाई करण्यात यावी. रस्त्याचे बांधकाम वेगाने करून होणारी हानी टाळावी इत्यादी मागण्यांना घेऊन मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
** पोलिसांकडून कार्यकर्त्यांना अटक व सुटका
मागील दिवसांपासून निलज-कारधा राष्ट्रीय महामार्गाच्या होणाऱ्या बांधकामाची श्रेणी निकृष्ठ असल्याच्या तक्रारी असतांना जनतेनी संयमाची भूमिका घेतली. दरम्यान कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी तक्रारी करून देखील वरिष्ठांकडून कानाडोळा करण्यात आला. जनतेच्या होणाऱ्या नुकसानीच्या संवेदना उराशी बाळगून कांग्रेस पक्षाने बांधकाम यंत्रनेविरोधात एल्गार पुकारला. जवाहर गेटजवळ झालेल्या रस्ता रोको आंदोलनाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तीन तास वाहतूक थांबल्याने तालुका प्रशासनाची दमछाक झाली होती. आंदोलकांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळाला भेट दिल्याशिवाय रस्त्यावरून न हटण्याची भूमिका घेतल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. दरम्यान पोलिसांनी पोलीस कुमक मागवून आंदोलन समिटण्याचा प्रयत्न चालविला. जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई व त्यांच्या एकूण ३० सहकाऱ्यांना पोलीस गाडीत टाकून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी पोलिसांनी अटक केलेल्या आंदोलकांना दीड तास नजर कैदेत ठेवले. यावेळी उपजिल्हाधिकारी भस्के, तहसीलदार नीलिमा रंगारी, उप अभियंता जगताप यांचेशी चर्चा करून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्याने सर्वाची सुटका करण्यात आली. आंदोलनामध्ये मोहन पंचभाई, विकास राऊत, राजकपूर राऊत, धर्मेंद्र नंदरधने, शंकरराव तेलमासरे, तुळशीदास बिलवणे, मनोहर उरकुडकर, विजय रायपूरकर, राकेश बिसने, महेश नान्हे, भगवान नवघरे, शाम धनविजय, शामलाल सावरबांधे, निलेश सवरबांधे, रामचंद्र पाटील, चेतन हेडावू, सुरेश ब्राह्मणकार, धनंजय तिरपुडे, रामेश्वर मते, अमित जीभकाटे, हंसाताई खोब्रागडे, वंदना नंदागवळी, जया भाजीपाले, ताराबाई नागपुरे, कैलास खंदाडे, नरेंद्र बिलवणे, अशोक पारधी, अनिकेत गभने, बंडू ढेंगरे, राजेंद्र भुरे, हंसराज गजभिये, पुष्पराज लांडगे, सतीश बावनकर, विलास घावले इत्यादी उपस्थित होते