Thursday, April 25, 2024
Homeचंद्रपुरगडचांदूर येथे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत जनजागृती

गडचांदूर येथे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत जनजागृती

गडचांदुर :- मो.रफिक शेख.
सुदृढ बालके घडविण्याची फार मोठी जबाबदारी अंगणवाडी कार्यकर्तीवर आहे, हे गांभिर्य ओळखून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले पाहिजे.असे प्रतिपादन कोरपनाचे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश जाधव यांनी केले.ते गडचांदूर विभागाच्या गडचांदूर येथील अंगणवाडी क्र.५ येथे ता. ८ सप्टेंबर रोज बुधवारी झालेल्या राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रमांचे उद्घाटक म्हणून बोलत होते. तसेच त्यांनी गरोदर माता, स्तनदा माता, आणि किशोरी मुलीचे एच बी तपासणी आणि त्यामध्ये वाढ करण्याबाबत तसेच परसबागेचे महत्त्व याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले गडचांदूर नगर परिषदेचे नगरसेवक तथा आरोग्य सभापती राहुल उमरे आणि नगरसेवक सागर ठाकूरवार यांनी समयोचित मार्गदर्शन केले.

कार्यक्रमानंतर परसबाग आणि लावण्यात आलेल्या सुदृढ आहार प्रदर्शनीत उपस्थित महिलांना प्रात्यक्षिके दाखवली आणि याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच सदर कार्यक्रमांच्या निमित्ताने पोषण आहार रॅली काढण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गडचांदूर विभागाच्या पर्यवेक्षिका द्रोपदी तोतडे यांनी आणि आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका लता अहिरकर यांनी केले. कार्यक्रमास गडचांदूर विभागाच्या सर्व अंगणवाडी सेविका आणि या परिसरातील बहुसंख्य महिला, किशोरी मुली आणि बालकांनी उपस्थिती दर्शविली.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular