Monday, March 4, 2024
Homeभंडाराआरोग्य व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सायकल चालवणे गरजेचे- आशा मेश्राम

आरोग्य व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सायकल चालवणे गरजेचे- आशा मेश्राम

*जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅली
भंडारा :
आरोग्यासाठी व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सायकल चालवणे उपयुक्त आहे. याबद्दल जिल्ह्यातील शेवटच्या घटका पर्यंत जनजागृती होणे गरजेचे आहे. साधे, परवडणारे स्वच्छ, टिकाऊ वाहतुकीचे साधन म्हणून तरुणांना शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांनी केले.


त्या शिवाजी स्टेडियम येथे आयोजित नेहरू युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीला संबोधित करतांना बोलत होत्या.
सायकल रॅलीचा शुभारंभ नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष आशू गोंडाणे, माजी नगरसेविका जयश्री बोरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी हितेंद्र वैद्य, पर्यावरण प्रेमी कार्तिक मेश्राम, जिल्हा सायकल कल्बचे सचिव विलास केजरकर, कार्यक्रम सहायक रमेश अहिरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक कोयल मेश्राम, क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी, क्रीडा मार्गदर्शक मंगेश गुडधे, क्रीडा अधिकारी मनोज पंधाराम इत्यादीक मान्यवर उपस्थितीत होते.
त्यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन जागतिक सायकल दिनाचे महत्त्व नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी हितेंद्र वैद्य यांनी सांगितले.
सायकल रॅली शिवाजी स्टेडियम येथून पोस्ट ऑफिस ते गांधी चौक मार्गे मुस्लिम लायब्ररी चौक वरून शिवाजी स्टेडियम येथे सर्व उपस्थित युवक- युवतींना नास्ता वितरण करुन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. त्याप्रसंगी सामान्य विद्यार्थ्यांनी कोणत्याही दिवसाच्या निमित्ताने प्रशासना सोबतच सामाजिक संस्था, क्रीडा संघटना, खाजगी क्षेत्र आणि अन्य संबंधित क्षेत्रांतील नागरिकांनी जनजागृती उपक्रमात सहभाग घेणे आवश्यक आहे असे मत नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष आशू गोंडाणे, माजी नगरसेविका जयश्री बोरकर यांनी सांगितले तसेच उपस्थित मान्यवरांनी मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.
सायकल रॅलीत बांते व बोरकर पोलीस ॲकॅडमीचे प्रशिक्षणार्थी युवक -युवती मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विशाल बांते, जयंत तांडेकर, अश्चिन, राज पिल्लारे, आकाश खोत, रामभाऊ धुडसे, सुरज लेंडे, संध्या जुनुनकर, अभिजित मेश्राम, अतुल गेडाम, सुर्यकांत मरघडे, प्रशांत नागपुरे, नेहरू युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी तसेचआरोग्य व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सायकल चालवणे गरजेचे-
*आशा मेश्राम

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular