Saturday, April 20, 2024
Homeभंडारातुमसरात गळा चिरून युवकाची निर्घृण हत्या!

तुमसरात गळा चिरून युवकाची निर्घृण हत्या!

घटनेच्या चार तासात आरोपी जेर बंद

तुमसर : प्रेम प्रकरण आणि त्यातून जोडप्यांचे घरून पळून जाणे अन् तक्रार होऊन दोन्ही परिवारासमक्ष पोलिसांमार्फत समजूत घालून प्रकरण सांभाळून घेणे यात फक्त दोन दिवसच लोटता न लोटता त्यातूनच हत्येचा थरार घडल्याने तुमसर शहरात एकच खळबळ माजली आहे. सदर थरार तुमसर-देव्हाडी मार्गावरील श्री प्रसाद हॉटेलच्या अलगद समोर घडला आहे. शुक्रवार,३ जूनच्या सायंकाळी ६:३० च्या दरम्यान सुनियोजित पद्धतीने घडवून आणलेल्या ह्या थरारात हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव सचिन गजानन मस्के(२३, राह.नेहरू नगर तुमसर) असे आहे. त्यात मारेकऱ्यांनी मृतकच्या गळ्यावर धारदार तलवारीने तब्बल २५ वार करून क्रूरतेचा कळस गाठला आहे. दिवसा ढवळ्या घडलेला हत्येचा थरार प्रसाद हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून मृतक सचिन व त्याचे मारेकरी एकाच दुचाकीने घटना स्थळावर आल्याचे दिसत आहे. त्यात घटना घडताच पोलीसांनी अवघ्या दोन तासातच दोन आरोपी ताब्यात घेतले असून फरारीच्या बेतात असलेल्या तिसऱ्या आरोपीला भंडारा येथून अटक करण्यात आली आहे. त्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कुलदीप मनोहर लोखंडे(२९), केतन दिलीप मदरकर(२५) , रंजित सहादेव गभणे(३३) तीघेही राह. ढोलीपुरा, शिवाजी नगर तुमसर यांच्या समावेश असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी दिली आहे.

शहरातील तुमसर-देव्हाडी मार्गावरील प्रसाद हॉटेल समोर क्रूरतेचा कळस गाठणारा युवकाच्या हत्येचा थरार घडला आहे. शुक्रवारच्या सायंकाळी ६:३४ वाजता घडलेल्या थरारात तीन परिचित मारेकऱ्यांनीच प्रेम प्रकरणातून दिवसा ढवळ्या मृतक सचिनचा काटा काढला. सदर घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्याच चित्रफितीचा आधार घेऊन तुमसर पोलीसांनी घटनेच्या अवघ्या ४ तासात तिन्ही आरोपींना जेर बंद केले आहे. त्यातील आरोपी कुलदीप लोखंडे याच्याच परिवारातील मुलीशी मृतकचे प्रेम सुत जुळले होते. सदर प्रेम प्रकरणातून मृतक अन् मुलगी २७ मे रोजी घरून पळून गेले होते. तुमसर पोलिसांत तशी रीतसर तक्रार दोन्ही परिवाराने दाखल केली होती. त्यातूनच १ जून रोजी तुमसर पोलीसांनी मृतक अन् मुलीला नागपूरहून ताब्यात घेतले होते. पोलिसांनी त्या प्रकरणात दोन्ही परिवारांची समजूतही घातली होती होती. येथे घटनेच्या आदल्या दिवशी तुमसर पोलीसांनी मृतकसह व मुलीच्या परिवाराला प्रतिबंधात्मक कारवाहीची नोटीसही बजावली होती. परंतु सैराट मूव्ही सारखा प्रेमद्वेष सचिनच्या हत्येने संपविण्यात आल्याची माहिती तुमसर पोलिसांनी दिली आहे. येथे मारेकरी आणि मृतकची एकमेकांशी घनिष्ठ मैत्री असल्याचे पुरावे फेसबुक वरून स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे हत्येचा तो थरार सुनियोजित पद्धतीने घडविण्यात आला असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular