*संस्थाध्यक्ष प्रा.देवेंद्र पिसे यांच्या हस्ते वृक्षारोपण*
ब्रम्हपुरी/
ब्रम्हपुरी तालुक्यातील बेटाळा येथील महाराष्ट्र इंस्टिट्युट आँफ पाँलीटेक्निक, महाराष्ट्र इंस्टिट्युट आँफ डि फार्म व बी फार्म महाविद्यालयाच्या परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.
सदर वृक्षारोपण हे यंग इंजिनिअर्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.देवेंद्र पिसे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना प्रा. देवेंद्र पिसे म्हणाले कि, निसर्गाचा समतोल योग्य राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असून प्रत्येकाने एक तरी लावलेच पाहिजे.
आणि झाड लावल्यानंतर त्याचे योग्य पध्दतीने संगोपन करणे हे सुध्दा आपले कर्तव्य समजले पाहिजे.
सदर महाविद्यालयाचे परीसर हे हिरवेगार बनवणार असल्याचे सुध्दा त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी 150 वृक्षांची लागवड करण्यात आली.
याप्रसंगी महाराष्ट्र इंस्टिट्युट आँफ पाँलीटेक्निकचे प्राचार्य प्रा.सुयोग बाळबुध्दे, प्रा.नरेंद्र समर्थ, प्रा.असद शेख, प्रा.रुपेश ढोरे, प्रा. महाजन, प्रा.पुरहवीराज मेश्राम, प्रा.योगेश भर्रे, प्रा.आशिष ठेंगरे, प्रा. हितेश सहारे, प्रा. उमाकांत ठेंगरी, राहुल हाडगे, प्रितम वैद्य, भुपेश गोस्वामी यांची उपस्थिती होती.