१८ पैकी १८ जागा मिळवून रचला इतिहास
विदर्भ कल्याण/नागपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर ( कळमना मार्केट ) च्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास , क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या सहकार पॅनल ने इतिहास घडवत सर्व १८ ही जागेवर धडाक्यात विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडविला आहे . सुनील केदार यांच्या सहकार पॅनल चे सेवा सहकारी संस्था मतदार संघातून विजय चौधरी , वसंतराव लांडगे , प्रकाश नागपुरे , अजय राऊत , बेनिराम राऊत , अहमदभाई शेख , बाबाराव शिंदे , रवीचंद्राबाई नांदूरकर , अंजली शिंदे , हरिभाऊ गाडबैल , अशोक सोनवाने तसेच ग्रामपंचायत मतदारसंघातील संजय कुंटे , दीपक राऊत , महेश चोखंद्रे , नारायण कापसे तसेच व्यापारी मतदारसंघातील प्रकाश वाधवाणी , अतुल सेनाड व हमाल मतदारसंघातून किशोर पलांदूरकर यांनी घवघवीत विजय मिळविला आहे . आपल्या वक्तव्यात मंत्री सुनील केदार यांनी सांगितले की , बाजार समितीचा हा विजय सहकार क्षेत्राचा विजय आहे . व सहकार विरोधी यांना शिकवलेला धडा आहे . १ ९ ७४ ला सहकार महर्षी श्रद्धेय बाबासाहेब केदार यांचा पुढाकाराने स्थापित बाजार समितीमधे सामान्य शेतकरी वर्गाला न्याय देण्याकरिता अविरत मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहे . आतातरी केंद्र शासनाने केलेल्या शेतकरी विरोधी कायद्याबाबत विचार करावा . नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद असो वा बाजार समितीच्या झालेल्या निवडणुका असो या निकालाने भाजपाचा खरा चेहरा जनते समोर आला आहे . येत्या काळात सुद्धा समस्त जनता भाजपाला त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नसल्याचे मंत्री सुनील केदार यांनी सांगितले आहे . कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विजया नंतर शेतकरी , कष्टकरी वर्गाला योग्य न्याय देण्यात येणार असल्याचे मंत्री सुनील केदार यांनी सांगितले . यावेळी प्रमुख रूपाने माजी मंत्री रमेश बंग , माजी आमदार विजय घोडमारे , जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ रश्मी बर्वे , माजी जीप अध्यक्ष सुरेश भोयर , माजी जीप उपाध्यक्ष मनोहर कुंभारे , जीप सदस्या भरती पाटील , ममता धोपटे , कुंदा राऊत , अवंतिका लेकुरवाळे , वृंदा नागपुरे , प्रकाश खापरे , दिनेश ढोले हिंगणा पंचायत समिती सभापती रेखा वरठी , उपसभापती संजय चिकटे , पंस सदस्य उज्वला खडसे , प्रीती अखंड , रुपाली मनोहर , अपर्णा राऊत उपस्थित होते .