Thursday, September 19, 2024
Homeचंद्रपुर६ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला १४ वर्षाची शिक्षा

६ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला १४ वर्षाची शिक्षा

विदर्भ कल्याण/
चंद्रपूर:
पोलीस स्टेशन दुर्गापुर हदद्दीतील मेजर गेट जवळ वैद्य नगर दुर्गापुर येथिल ६ वर्षाच्या मुलीवर लैंगीक अत्याचार करण्यात आला होता.अत्याचार करणाऱ्या आरोपीस दि २७/११/२०२१ रोजी मा.जिल्हा न्यायाधीश अन्सारी मॅडम ,कोर्ट २ रे चंद्रपुर यांनी १४ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.


पोलीस स्टेशन दुर्गापुर हददीतील मेजर गेट जवळ वैद्य नगर दुर्गापुर येथे फिर्यादीची सहा वर्षाची मुलगी खेळत असताना अनोळखी आरोपीने तिला खावु घेवुन देण्याचे बहान्याने आपले सोबत घेवून गेला व दुकाना मधुन खावु घेवुन दिला व तिला नॅशनल शाळेजवळ नेवून तिचेवर लैंगीक अत्याचार केला . पिडीत मुलीची तब्येत खराब झाल्याने ताबडतोब तिच्या आईने पिडीत मुलीला दवाखान्यात घेवून गेल्याने वैद्यकीय तपासणी रिपोर्ट वरुन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्याने फिर्यादीच्या तक्रारी वरुन पोलीस स्टेशन दुर्गापुर येथे अपराध क्रमांक १८२/२०१७ कलम ३७६( २ ) ,( ( I ) ( J ) ( M )भादंवि सहकलम ६ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधीनियम २०१२ सहकलम ३१ ) ( W ) ) ( ii ) ( ३ ) ( २ ) V अ.जा. ज . अ . प्र . कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular