Thursday, April 25, 2024
Homeचंद्रपुरधानाचे पुंजके जळालेल्या शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आर्थिक मदत

धानाचे पुंजके जळालेल्या शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आर्थिक मदत

पालकमंत्री नाम विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते धनादेश वितरित

ब्रम्हपुरी :- ब्रह्मपुरी तालुक्यातील गोगाव शेतशिवारात बरडकीन्ही येथील विलास भरडकर व नांदगाव जाणी येथील मंगला गुरु यांची शेती आहे.
खरीप हंगामातील धानपीक कापणी करून ह्या दोघांनीही आपआपल्या शेतात धानाचे पुंजणे करून ठेवले होते. मात्र १२ नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास दोघांच्याही शेतातील पुंजण्याला आग लागली आणि संपूर्ण धानाचे पुंजणे आगीत जळून खाक झाले. त्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले.


सदरची बाब जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालिका सुचित्राताई ठाकरे यांना कळताच त्यांनी दोन्ही शेतकऱ्यांना शेतकरी कल्याण निधी अंतर्गत प्रस्ताव बनवण्यासाठी सांगितले. व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या पुढाकाराने ते प्रस्ताव तातडीने मंजूर करून दोन्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
सदरच्या धनादेशाचे वितरण राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत-पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
यावेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालिका सुचित्राताई ठाकरे, ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रभाकर सेलोकर, अण्णाजी ठाकरे, जि.प.सदस्य डाॅ. राजेश कांबळे, जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर, पंचायत समिती सदस्य थानेश्वर कायरकर, महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्षा मंगलाताई लोनबले, अनुसूचित जाती सेलचे तालुका अध्यक्ष प्रमोद मोटघरे, सरपंच उमेश धोटे यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular