Wednesday, June 7, 2023
Homeचंद्रपुरसुदाम ठाकरे करीत आहेत आज ही निष्काम निस्वार्थ सेवा

सुदाम ठाकरे करीत आहेत आज ही निष्काम निस्वार्थ सेवा

ब्रमाहपुरी तालुक्यातील रूई (नीलज ) या छोटाश्या गावात एका सर्व साधारण गरीब परीस्थिती मध्ये असलेल्या कुटूंबात सुदाम केवाजी ठाकरे यांचा जन्म झाला ते कसेबसे वर्ग बारावी पर्यंत शिक्षण घेतले त्यानंतर सुदाम केवाजी ठाकरे यांनी निस्वार्थ सेवा तसेच धार्मीक अध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी आपला पाया रूजविला आणी ते वारकरी संप्रदायात सहभागी झाले आणी नागपूर ते पंढरपूर पालखी पदयाञेत वारकरी म्हणून काम करू लागले एवढेच नव्हे तर अड्याळ टेकडी येथील श्री.गुरूदेव आत्मानुसंधान केंद्रात स्वर्गीय तुकारामदादा यांच्या सहवासात गेली पस्तीस वर्षे राहून ते निष्काम सेवा करीत होते गावात कीवा बाहेर गावी एखाद्या लहान मुलाचे नामकरण विधी,लग्न सोहळा,भागवत सहप्ता मध्ये ग्रामगीतेच प्रवचन सांगत असतात सुदाम केवाजी ठाकरे इथेच थांबते नाही तर लोंकाना निसर्गर उपचाराचे देखील धडे देतात तसेच रूई (निलज) गावात सार्वजनिक वाचनालयाला पण सुरवात केली गावाच्या शेजारी असलेल्या रोडच्या बाजुला फळाचे झाडे लावून त्यांची जोपासना नेहमी करीत असता आज वयाचे सत्तर वर्षे असलेले सुदाम केवाजी ठाकरे हे ब्रम्हपुरी तालुक्यातील अथवा बाहेर दुस-या जिल्ह्यातील कुठल्याही धार्मिक स्थळावरील कार्यक्रमात निष्काम निस्वार्थ सेवा करीत असतात गावात आणि बाहेर गावी कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यक्रम पोवाडा तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करीत असतात सुदाम केवाजी ठाकरे यांचे निष्काम निस्वार्थ सेवा इत्तरान साठी प्रेरणादाई ठरत आहेत.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
- Advertisment -

Most Popular