भद्रावती– नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्या विदर्भस्तरिय माॅडलिंग स्पर्धेत येथील खुशी विश्वजीत सरकार या युवतीने प्रथम क्रमांक पटकावला असून तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

सदर स्पर्धेत विदर्भाच्या विविध शहरांतील १५ युवक व १५ युवती स्पर्धक सहभागी झाले होते.यात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, भद्रावती, अढ्याळ या शहरांतील स्पर्धकांचा समावेश आहे.या स्पर्धेचे आयोजन सौम्य नामेवार यांनी केले होते.