Thursday, April 25, 2024
Homeचंद्रपुरअनधिकृत पोस्टरबाजी ने शहराचे विद्रुपीकरण

अनधिकृत पोस्टरबाजी ने शहराचे विद्रुपीकरण

ब्रम्हपुरी -सार्वजनिक मालमत्तेचा वापर करून शहरात अनधिकृत जाहिरातबाजी करण्याचे प्रमाण वाढले आहे. खाजगी शिकवणी वर्ग जाहिरात , विविध बी बियाणे कंपन्यांची जाहिरात, स्व:नेत्यांच्या जाहिराती अशा विविध प्रकारच्या जाहिरातीचे पोस्टर शहरातील अंतर्गत तसेच प्रमुख चौका-चौका मध्ये दिसून येत आहेत. या अनधिकृत जाहिरातीवर कार्रवाही करण्याची जवाबदारी नगरपरिषद विभागाकडे आहे. परंतु त्यांच्या कडून अनधिकृत जाहिरातबाजी वर कसलीही कार्रवाही होत नसल्याने शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे दिसून येते.

——————————-अनधिकृत जाहिरात करून आपल्या खाजगी व्यवसायाला प्रसिद्धी देण्याचे काम शहरात सध्या जोमात सुरु आहे, विनामूल्य आणी झटपट जाहिरात करण्यासाठी रात्रौच्या काळोखाची संधी साधून शहरातील विद्युत खांब, डी.पी.व झाडावर जाहिरातीचे पोस्टर लावल्या जातात. मात्र यासाठी सार्वजनिक मालमत्तेचा वापर करून शहराला विद्रुप करण्याचे काम या व्यवसायिकांकडून करण्यात येत आहे, या प्रकारावर नगरपरिषद विभागाची कृपादृष्टी असल्याने कार्रवाही केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. संबंधित विभागातील पथक यावर कसलीही कार्रवाही करत नसल्याने अनधिकृत जाहिरातबाजी ला उधाण आले आहे. ———————————शहर विद्रुपीकरण कायद्या अंतर्गत अशा जाहिरातीवर कार्रवाही करणे गरजेचे असतांना यावर कार्रवाही केल्या जात नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular