Saturday, February 4, 2023
Homeचंद्रपुरबिरसा क्रांती दल जिल्हा चंद्रपूर दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर ( कॅडर कॅम्प)...

बिरसा क्रांती दल जिल्हा चंद्रपूर दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर ( कॅडर कॅम्प) राजूरा येथे संपन्न

राजूरा / प्रतिनिधी

बिरसा क्रांती दल जिल्हा चंद्रपूर च्या वतीने दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबीर राजूरा येथे 27 व 28 नोव्हेंबर ला. संपन्न झाली.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बिरसा क्रांती दल संस्थापक अध्यक्ष मा. दशरथ जी मडावी ह्यांच्या हस्ते शिबिराचा शुभारंभ झाला.


शिबिराचे प्रमुख पाहुणे म्हणून डि. बि. अंबुरे, वि. डि. कोवे. वाघुजी गेडाम आदिवासी समाज सेवक (म. रा.) ह्यांनी वीर बाबुराव शेडमाके, धरती आबा बिरसा मुंडा ह्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
डॉ. मधुकर कोटनाके कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगून दिपक मडावी ह्यांनी सूत्रसंचालन केले.
पाहिले सत्र कॅडर कसा असावा ह्या बदल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आदिवासी समाजाचे स्वतंत्र लढे, सामाजिक चळवळीत आदिवासी समाजाचा स्वतंत्र इतिहास आहे. चळवळ कुणी उभ्या केल्या ह्या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले
. दुसर्‍या दिवसाचे सत्र शिबिराच्या ठिकाणी. आलेल्या पाहुण्याच्या हस्ते झाडे लावून करण्यात आली. ह्या सत्रात आरक्षणाचा इतिहास, आदिवासी संस्कृती व तत्त्वज्ञान, आदिवासी समाजाची राजकिय स्थिती ह्यावर चर्चा करण्यात आली. शेवट च्या सत्र मधे वैधानिक दृष्टीकोण, अंधश्रद्धा निर्मूलन ह्या मुद्द्यावर प्रयोग करून दाखविण्यात आले.
प्रशिक्षणाला राज्य अध्यक्ष महिला फोरम गिरिजा उईके,संतोष कूलमेथे, धीरज मेश्राम, विनोद गेडाम, जितेश कूलमेथे, बंडू मडावी, लक्ष्मण कुमरे प्रभाकर गेडाम, प्रदीप गेडाम. देवानंद .दौलत कडते उत्तम गेडाम, प्रमोद कुमरे, महिपाल मडावी, विद्या कीनाके, प्रिती मडावी, डॉ शुभम कुमरे, पोर्णिमा तोडकर, अभिलास परचाके, अश्विनी सिडाम, सुशील मडावी, रमेश आडे, सदानंद मडावी, राजेंद्र धुर्वे, सुयोग मसराम, अरुण कुमरे, नरेंद्र कूलमेथे, नटवरलाल खंडाते. देव मेश्राम, संतोष मडावी, अस्मिता मडावी, प्रशांत सोयाम, नितेश बोरकुटे, मनोहर मेश्राम, आकाश गेडाम, सौ किरण गेडाम, प्रभाकर मडावी, विनोद मडावी, उर्मिला उईके, साधना कीनाके, संतोष गेडाम, शांताराम कोडापे, बल्लारपूर येथिल सामाजिक कार्यकर्ते, कोरपणा, राजूरा येथील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
- Advertisment -

Most Popular

03/02/2023

02/02/2023

01/02/2023