जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल रोड ला असलेल्या चिचपल्ली गावातील बांबू प्रशिक्षण केंद्र हे चंद्रपूर जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण विदर्भासाठी खूप मोठी धरोहर होणार असून यांचे स्वप्न मा माजी पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवर यांनी पहिले व पूर्ण केले असून आता या सुधीर भाऊ च्या स्वप्नना ला कुठे तरी भ्रष्टाचाराचे तळे जाणार की काय असच काही वाटत आहे. बांबू प्रशिक्षण केंद्राला आता भ्रष्टाचार चे ग्रहण लागले असून या बांबू प्रशिक्षण केंद्राचे काम निकृष्ट दर्जेचे झाले असल्याचे व अधिकारी वरती फौजदारी गुन्हे दाखल करून दोनही कंत्राट कंपनी ला काळ्या यादीत टाकण्याची मागणी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थाच्या वतीने करण्यात आली आहे.
बांबू प्रशिक्षण केंद्र हे मूल रोड लगत चिचपल्ली गावात बनत असून हे काम दोन मोठया कंत्राटी कंपन्यांl9ना दिले असून हे बांधकाम डी वी पटेल व jans nkkc ( JV ) यांच्या मार्फत होत असून बांधकामात मोठया भ्रष्टाचार झाला असून या कामाची उच्च स्थरीय चौकशी करून कंत्राट कंपनीला काळ्या यादीत टाकून संबंधित अधिकारी वरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी राजेश बेले यांनी तक्रार केली आहे. त्यांनी आमच्या शी बोलतांना डी वी पटेल कंपनीला 11 करोड 89 लक्ष 600 रुपये चे बांधकाम करण्याचा कंत्राट मिळाला असून JANS NKKC (JV) या कंत्राट कंपनी ला 26 करोड 96 लक्ष 9 हजार 200 रुपये च्या कंत्राट मिळाला असून यांनी निकृष्ट साहित्य वापरून भ्रष्टाचार केल्याची तक्रार संबंधित विभागात दिली असून यावरती कार्यवाही करण्याची मागणी यांच्या वतीने होत आहे. या कामात कॉक्रीट BCC RCC च्या बोल्डर सोलींग ( खडीकरण ) न करता निकृष्ट दर्जेची कॉक्रीट BCC हे निकृष्ट दर्जेनी करण्यात आली असून इमारतीचे बांधकाम करतांना नियमाला डावलून इमारतीची जुडाई करण्यात आली वापरण्यात आलेले सिमेंट चे प्रमाण कमी होते इमारतीच्या छत टाकते वेळी योग्य वाळू, लोहा, सळाख व RCC कॉक्रीट नियमानुसार न वापरल्यामुळे संपूर्ण इमारतीचे छत पाणी गडणे लिकेज सुरु झालेले आहे. या बांबू प्रशिक्षण केंद्र च्या इमारतीचे बांबूने बनविले छत आताच कुठे कुठे तुटून राहिले आहे. या बांधकामावरती लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्यामुळे त्यांच्या वर कार्यवाही करने काळाची गरज असल्याचे दिसून येत आहेत व मा माजी पालकमंत्रीनी बघितलेल्या सुवर्ण स्वप्नाला वाचवण्याची गरज आहे.