Tuesday, December 5, 2023
No menu items!
Home चंद्रपुर दारुबंदिची काटेकोर अंमलबजावणी करा अन्यथा दारुबंदी उठवा

दारुबंदिची काटेकोर अंमलबजावणी करा अन्यथा दारुबंदी उठवा


भद्रावती तालूक्यातील नगारीकांची मागणी अनेक युवक दारुतस्करीच्या व्यवसायात

भद्रावती: शहर तथा तालूक्यात व जिल्यात दारुबंदी असतांना सुध्दा दारुचा महापुर आला असुन दारुबंदीमुळे समाजातील स्वास्थ सुधारण्यापेक्षा ते अधीकाधिक बिघडत चालले आहे या अवैध व्यवसायात बेरोजगार युवक तथा शाळेकरी मुले गंुतले असुन त्यांचे भावी आयुष्य बरबाद होत आहे.

त्यामुळे जिल्हयातील दारुबंदी ही काटेकोरपणे राबवावी किंवा जिल्हयातील दारुबंदी उठवावी अषी मागणी भद्रावती तालूक्यातील नागरीक करीत आहे. जिल्यात दारुबंदी झाल्यानंतर जिल्यातील सामाजीक स्थिती सुधारेल अषी आषा होती मात्र ही आषा आता फोल ठरली आहे. दारु सुरु असतांना केवळ दारुच्या दुकानाच्या परिसरातीलच स्थिती खराब असायची मात्र दारुबंदि झाली आणी शहरात तथा तालूक्यातील प्रत्येक गावात गल्ली बोळात अवैध दारु विक्रिचे अनाधिकृत क्रेंद्र निर्माण झाले. या अवैध दारु विक्रेत्यावर पोलीस प्रषासनाचे वरदान असल्यामुळे हा अवैद्य व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. या व्यवसायात सहजपणे आणि भरपूर पैसा मीळत असल्याने अनेक तरुन, बेरोजगार युवक या अवैध धंदयाकडे आकर्षीत झाले. या व्यवसायापासून शाळकरी युवक सुध्दा सुटलेले नाही. याचा परिणाम त्यांच्या भावी आयुष्यावर होवून ते बरबाद होत आहे. गल्ली गोळात अनेक दारु तस्कर निर्माण झाल्यामुळे त्यांच्यात स्पर्धा निर्माण होवुन आपसी संघर्ष वाढत आहे. त्यामुळे शहर तथा तालूक्याचे सामाजिक स्वास्थ पूर्णपणे बिघडले आहे. दारुबंदिचा फटका केंद्राच्या स्वच्छता अभियानाला सुध्दा मोठया प्रमाणावर बसला असुन शहरातील खुले मैदान, सार्वजनिक शौचालय, गटारे व ईतर सार्वजनिक ठीकाणी दारुच्या रिकाम्या बाॅटल्स, चकण्याची रिकामी पाॅकीटे, पाण्याच्या रिकाम्या लाॅस्टीक बाॅटल्स यांचा खच पडलेला दिसत आहे. यातून शहरातील धार्मीक स्थळे व स्मषान भुम्या ही सुटलेल्या नाहीत त्यामुळे स्वच्छतेत आणखी अच्छतेची भर पडली आहे. शहरातील सफाई अभियानात दारुच्या रिकाम्या बाॅटला व ईतर सबंधीत वस्तुच जास्त प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे स्वच्छता अभीयानाचा पुरता फज्जा उडालेला आहे. या समस्येमुळे स्थानीक नगर पालीका प्रषासनही परेषान झाले आहे. दारुबंदीमुळे सर्वत्र दारु महाग झाली आहे त्यामुळे ही दारु परवडत नसल्यामुळे दारुडयांनी आपला मोर्चा गांजा, अफीम या सारख्या मादक द्रव्यांचा आसरा घेतल्यामुळे ते या अभद्र नषेच्या आहारी जाऊन आपले आरोग्य बिघडवित आहे. या व्यसनामुळे शहरात तथा तालूक्यात गांजा तथा अफीम विक्रेत्यांची संख्याही वाढलेली आहे. एकंदरीत दारुबंदिनंतर प्रष्न सुटण्याऐवजी ते आणखी चिघडत चाललेले आहे. त्यामुळे यावर तोडगा कढण्यासाठी एकतर जिल्हयातील दारुबंदी काटेकोरपणे अंमलात आणावी किंवा दारुबंदी उठवून अवैध दारुकेंद्र नष्ट करावी अषी मागणी भद्रावती शहर तथा तालूक्यातील नागरीक करीत आहे.

Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

चंद्रपूर ते पडोली,धानोरा,भोयगाव मार्गे गडचांदूर बस सुरू करा प्रहार ची मागणी

गडचांदूर:-गडचांदूर वरून चंद्रपूर जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी भोयगाव मार्ग,कमी खर्च व कमी वेळेचा मार्ग असल्याने नागरिक याच मार्गाला पसंती देतात.पुर्वी हा रस्ता अत्यंत...

लाइट्स मेटल्स उद्योगातर्फे परिसरातील गावातील गरजू विद्यार्थांना निशुल्क औद्योगिक प्रशिक्षण

घुग्घुस येथील लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड अंतर्गत लॉईड्स इनफिनिट फॉउंडेशन तर्फे परिसरातील म्हातारदेवी, शेनगाव, उसगांव व घुग्घुस या गावातील २१ आवश्यक...

घुग्घुस शहरातील जनता कॉन्व्हेंन्ट येथे झाडांना राखी बांधून रक्षाबंधन

चांदा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जनता कॉन्व्हेंन्ट शाळा घुग्घुस येथे रक्षाबंधन अवचित्य साधून वृक्ष संवर्धनाची शपथ झाडांना राखी बांधून घेण्यात आली.

Most Popular

Recent Comments

Laura Heacock on 14/06/2021
Mike Canty on 27/06/2021
Malcolm Martin on 18/05/2021