उद्या बैठा सत्याग्रह आणि मुंडण आंदोलन
सर्व पक्षीय नगरपरिषद स्थापना समिती घुग्गुसच्या वतीने आज सोमवारला सकाळी 11 वाजता दरम्यान बसस्थानक चौकात टायर जाळून चक्का जाम आंदोलन अर्धातास करण्यात आले. नंतर हे चक्का जाम आंदोलन समाप्त करण्यात आले.
चक्का जाम आंदोलन करण्यात आल्याने वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या.
सर्व पक्षीय स्थापना समितीच्या नेत्यांनी स्वतः ला अटक करून घेतली. घुग्गुस पोलिसांनी ताब्यात घेतले व घुग्गुस पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले.
नंतर आंदोलन कर्त्यांची सुटका करण्यात आली. आज सकाळी सर्व पक्षीय स्थापना समितीचे नेते ग्रामपंचायत कार्यालयात गोळा झाले. तिथून गांधी चौक, जुना बस्थानक मार्गे बस्थानक चौकात धडकले. घुग्गुस नगरपरिषद झालीच पाहिजे अशी प्रचंड नारे बाजी आणि घोषणाबाजी करण्यात आली.
पो.नि. राहुल गांगुर्डे यांनी चंद्रपूर येथून दंगा नियंत्रण पथक बोलाविले होते घुग्गुस पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडूनये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.