राहुल गांधी यांची 50 बाय 30 फूट रांगोळी आकार घेणार….
विदर्भ कल्याण/चंद्रपूर

भारत जोडो यात्रा दुसऱ्या चरणातून पुढे मार्गक्रमण करत असल्याच्या निमित्ताने बल्लारपुरात युवक काँग्रेसच्या वतीने 3 जाने.2023 रोजी बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले असून,खा.राहुल गांधी यांच्या भारत जोडो उपक्रमाची आठवण दीर्घकाळ असावी यासाठी स्थानिक रांगोळी चित्र कलावंत अनिल उस्कलवार, संतोष दुरडकर,योगेश गोंदे, कु.रीना वर्मा,प्रतीक्षा गेडाम हे राहुल गांधी यांची 50 बाय 30 फुट अशी भव्य रांगोळी साकारणार आहे.यात शंभर किलो रांगोळी खर्ची होणार आहे.यासाठी 18 तास मेहनत करावी लागणार असल्याचे कलावंतांचे म्हणणे आहे.
भारत जोडो यात्रेच्या पहिल्या चरणात बल्लारपूर शहरातून गटनेते देवेंद्र आर्य,चेतन गेडाम,हे 14 दिवस या यात्रेत सहभागी झाले होते…कांग्रेस पक्षात नवा उत्साह संचारीत करण्याच्या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन केले असून,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युथ काँग्रेस चे प्रदेश सहसचिव चेतन गेडाम,जिल्हा महासचिव शंकर महाकाली,बल्लारपूर अध्यक्ष अरबाज सिद्दीकी,विक्की गुजरकर,दानिश शेख,संदीप नक्षीने, नरेश गुंडापल्ली,आशिष मुळेवार, दिशांत सिद्दीकी इत्यादी कार्यकर्ते कामाला लागले आहे.
कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चेतन गेडाम यांनी केले आहे.