Tuesday, March 19, 2024
Homeचंद्रपुर5 जानेवारी ला सुषमा अंधारेंचा चंद्रपूरात व्याख्यान

5 जानेवारी ला सुषमा अंधारेंचा चंद्रपूरात व्याख्यान

विदर्भ कल्याण
चंद्रपूर-क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, मां फातिमा शेख, राजमाता जिजाऊ जयंती प्रीत्यर्थ स्मृतिशेष माणिक उर्फ महाकाली जंगम जन्मदिन व माता प्रमिला माणिक जंगम स्मरणार्थ पारंपारिक तेरवी व तत्सम कार्यक्रमांना छेद देत जीवनाबद्दल वास्तववादी व सकारात्मक वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा या उद्देशाने सामाजिक प्रबोधन, व्याख्यान व सन्मान पुरस्कार समारोह गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023, सायंकाळी 5.00 वाजता चंद्रपूर येथिल प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून प्रसिद्ध प्रखर वक्ता व पुरोगामी विचारवंत तथा शिवसेना उपनेता (ठाकरे गट) सुषमा अंधारे ह्या उपस्थित राहणार आहेत. ‘महापुरुषांच्या स्वप्नातील भारत : संवैधानिक मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची वर्तमान परिस्थिती’ या विषयावर त्या मार्गदर्शन करतील.

या प्रबोधन कार्यक्रमात वक्ता म्हणून प्रसिद्ध विचारवंत दिलीप सोळंके हे देखिल मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. पी. लॉ कॉलेज, चंद्रपूर चे माजी प्राचार्य डॉ. ए. पी. पिल्लई राहतील. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून विजय वडेट्‌टीवार, आमदार, ब्रम्हपुरी, अॅड. मोरेश्वर टेमुर्डे, माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, संदिप गिर्हे, जिल्हा प्रमुख, शिवसेना (ठाकरे गट), राजीव कक्कड़, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस, रितेश तिवारी, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस, भूषण फुसे, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, मनदिप रोडे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, अजहर शेख, शहर अध्यक्ष, एआईएमआईएम, सुरज ठाकरे, जिल्हाध्यक्ष, युवा स्वाभिमान पक्ष, पप्पू देशमुख, संस्थापक अध्यक्ष, जनविकास सेना, राजू झोडे, जिल्हाध्यक्ष, उलगुलान संघटना, डॉ. सचिन भेदे, प्रसिद्ध मनोचिकित्सक, डॉ. चेतन खुटेमाटे, प्रसिद्ध नेत्रतज्ञ, रविंद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्ता उपस्थित राहणार आहेत.
या समारोहात सत्कार भूषण म्हणून समाजात उल्लेखनिय कार्य करणार्यांचा सत्कार व सन्मान करण्यात येईल. पत्रकारितेसाठी प्रमोद काकडे, कला क्षेत्रात शैलेश दुपारे, साहित्य क्षेत्रात प्रा. डॉ. पद्मरेखा धनकर, सामाजिक क्षेत्रात डॉ. राकेश गावतुरे व डॉ. अभिलाषा बेहरे दंपतीचा सन्मान केल्या जाईल. आयोजक म्हणून शहरातील 32 संघठनांचा या आयोजनात सहभाग असणार आहे. ही माहिती आयोजकां तर्फे कबीरा इन्वेस्टिगेशन एंड रिसर्च प्रा. लि. ने दिली आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

Most Popular