घुग्घुस येथील कोरोना पाॅझीटीव रुग्णांना गृह विलगीकरणात घरी राहण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे घुग्घुस येथील कोरोना पाॅझीटीव रुग्णांना चंद्रपुर येथील वनविभागाच्या अकॅडमीत गृह विलगीकरणात ठेवण्यात येत होते.
घुग्घुस येथील ज्या कोरोना पाॅझीटीव रुग्णांना स्वतःच्या घरी एकटे राहण्याची व शौचालयाची व्यवस्था आहे. या संदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी चंद्रपुर जिल्हाधिकारी व चंद्रपुर जिल्हा शैल्यचिकीत्सक चर्चा करून विनंती केली व घुग्घुस येथे कोरोना पाॅझीटीव रुग्णांना गृह विलगीकरणाची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

घुग्घुस हे औद्योगिक शहर असलेल्या शहराची लोकसंख्या 40 ते 50 हजारांचा जवळपास आहे आहे. घुग्घुस शहरातील कोरोना पाॅझीटीव रुग्णांना चंद्रपुर जिल्ह्यात धाव घ्यावी लागत असे.
घुग्घुस शहर हे चंद्रपुर जिल्ह्याच्या जवळच असल्याने घुग्घुस शहरातील कोरोना पाॅझीटीव रुग्णांना गृह विलगीकरणाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या विनंतीला मान देऊन घुग्घुस येथे कोरोना पाॅझीटीव रुग्णांना गृह विलगीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची मागणी मंजूर करण्यात आली आहे.