गांगलवाडी येथे जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण
ब्रम्हपुरी/
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. कोरोना काळात तसेच गंभीर परिस्थितीत रुग्णाला कमीतकमी वेळेत दवाखान्यात पोहचविण्यासाठी व तातडीचे उपचार मिळण्यासाठी लाईफ सपोर्टची पुर्ण व्यवस्था असलेल्या 3८ अद्यावत रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन परीसरात या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून पार पडला.
नाम.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक परिश्रमाने जिल्ह्याच्या खनिज विकास निधीतून सर्व सुविधायुक्त 3८ रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहीका वातानुकुलीत असून अत्यावश्यक सोईसुविधांनी सुसज्ज आहेत.
त्यापैकी ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी, मेंडकी, चौगान, अऱ्हेरनवरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत.
गांगलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या रुग्णवाहिकेचे जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर यांच्या हस्ते स्वागत करून लोकार्पण करण्यात आले.
यावेळी सभापती रामलाल दोनाडकर, उपसभापती सुनिताताई ठवकर, माजी सरपंच ज्ञानेश्वर भोयर, माजी सरपंच ईश्वर ठाकरे, तालुका आरोग्य अधिकारी दुधपचारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुखदेवे, वैद्यकीय अधिकारी डाँ. किर्ती धनकर, चुमदेव जांभुळकर, संजय भोयर, शेन्डे मँडम, अंगणवाडी पर्यवेक्षिका बरडे, विस्तार अधिकारी खोब्रागडे, आशाताई मशाखेत्री, मनिषा देशमुख, व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी वृंद व नागरिक उपस्थित होते.
जिल्हाभरात हेल्थ मिशन राबविणे व ग्रामीण पातळीपर्यंत आरोग्य यंत्रणा अद्यावत करण्याचा मानस पालकमंत्री नाम.विजयभाऊ वडेट्टीवार यांचा असुन तालुक्यातील ४ आरोग्य केंद्रांना अद्यावत रुग्णवाहिका दिल्याबद्दल पालकमंत्री नाम.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे जि. प. सदस्य प्रमोद चिमुरकर यांनी आभार व्यक्त केले आहे.