महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करून अधिकारी झालेली तरुणी दर्शना पवार हिच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे. डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे.

राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडलेल्या दर्शना पवार या तरुणीचा खून झाला असल्याचा निष्पन्न झालं आहे. समोर आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून तिचा खून झाला असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. दर्शना पवार या तरुणीच्या डोक्यात आणि संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळुन आल्या आहेत. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली आहेत.
आषाढी वारीसाठी येणार १८ लाख वारकरी! पोलिसांचा ६ हजारांचा बंदोबस्त; वारकऱ्यांसाठी ५२५० बसगाड्यांची सोय
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या 26 वर्षीय दर्शना पवार हिचा संशयस्पद मृत्यू झाला आहे. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला होता. ती आणि तिचा एक मित्र ट्रेकिंगला गेले आणि त्यानंतर परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. After that the corpse of this young lady was suddenly found at the foot of Rajgad.