Tuesday, September 17, 2024
Homeवर्धामॉडेल हायस्कूलची दिशा खेनवार तालुक्यात प्रथम

मॉडेल हायस्कूलची दिशा खेनवार तालुक्यात प्रथम

कारंजा ( घा.): दहाव्या वर्गाचा नुकताच निकाल लागल्याने येथील मॉडेल हायस्कूलचा ९८ टक्के निकाल लागला आहे. मॉडेल हायस्कूल येथील वर्ग दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत दिशा दीपक खेनवार हिने ९९.६० टक्के गुण प्राप्त करून कारंजा तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर सृष्टी नियोजित किनकर ९८.६० टक्के घेऊन शाळेतून द्वितीय आलेली आहे.


संकेत चौधरी ९८.०० टक्के , लीना चोपडे ९७.६० टक्के,
रक्षा खेनवार ९७.६० टक्के,
वैष्णवी हिंगवे ९७.६० टक्के,
वैष्णवी लाटकर ९५.८० टक्के ,
प्रेरणा ढोले ९५.६० टक्के, आकांक्षा धोटे ९५.२० टक्के,
आर्या काळे ९५.०० टक्के,
कार्तिक इंगळे ९५.०० टक्के घेऊन
९५ टक्के च्या वर मॉडेल हायस्कूल चे ११ विद्यार्थी गुणानुक्रमे आलेले असून शाळेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.मॉडेल हायस्कूल शाळेचा निकाल 98 टक्के लागला आहे.
याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक हेमंत ढोले, उपमुख्याध्यापक सी. ए. पाटील, पर्यवेक्षक महादेव टोपले, वर्गशिक्षक योगेंद्र कांबळे,रवींद्र डोंगरदेव,संगीता शिरखेडकर, चंद्रशेखर गिऱ्हाळे, विनोद चाफले, एन. थोटे, एस. घोडे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गुणानुक्रमे येणाऱ्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरता शुभेच्छा व्यक्त केल्या आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -

Most Popular