Tuesday, September 17, 2024
Homeवर्धाभाजीपाला गाड्यांना दंड,वाळूच्या गाड्या मात्र उदंड!

भाजीपाला गाड्यांना दंड,वाळूच्या गाड्या मात्र उदंड!

समुद्रपूर तहसिलमध्ये अजब नियमात गजब कारभार
समुद्रपूर-
कोरणामुळे भाजीपाला विक्री,प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवरही निर्बंध आहेत.मात्र समुद्रपूरमध्ये वाळूच्या गाड्या रात्रंदिवस धावत आहेत.त्यांना या निर्बंधाचा तमा नाही का जिल्हाधिकाऱ्यांचे नियम यांच्या गाड्यासाठी लागू नसल्यासारखी परिस्थिती आहे.त्यामुळे अजब नियमात गजब कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे.


कोरोना निर्बंध काळात हातावर पोट असणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना घराबाहेर पडण्याची मुभा नाही. शेतीमाल घेऊन येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. जीवनावश्यक वस्तूची दुकाने उघडण्यासाठी मुभा देण्यात येत असली तरी,अशा दुकानावरील मालक नोकरांनी कोरोना तपासणी करणे बंधनकारक आहे.
तपासण्या नसल्यामुळे दुकानदारावर दंड करण्याचे प्रकार ही घडत आहेत. तर दुसरीकडे अवैद्य वाळू उत्खनन करून रात्रंदिवस शेकडो ट्रक टिप्पर धावत आहेत.मणगाव मांडगाव १ मांडगाव २ घाटातून समुद्रपूर,वर्धा, हिंगणघाट,विविध भागात ही वाहने वाळू टाकत आहे.त्यांना निर्बंध काळात वाहतूक करण्यास नियम लागू नसल्याची परिस्थिती आहे.वाळू वाहतूक करणारा गाड्यांमध्ये दोन-चार मजूर ड्रायव्हर गाडीमागे संरक्षण म्हणून दुचाकी चालकांचा ताफा असा लवाजमा असतो.


पोलीस ठाणे तहसील कार्यालयासमोर ही वाहने धावतात, कोणाकडे पावती आहे,कोणाकडे नाही याचीही कुणी तपासणी करीत नाही.घाटाचे लिलाव झाल्यापासून तर समुद्रपूर मध्ये वाळू घेऊन येणार्‍या वाहनांची नोंद ठेवण्याची गरज राहिली नाही.एकाच पावतीवर अनेक गाड्या वाळू वाहतूक करीत असल्याची धक्कादायक चित्र आहे.
हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांची व्यवहार बंद आहेत. भाजीपाला विक्रेत्यांच्या तपासण्या नाहीत म्हणून दंड वसुली होत.आहे मात्र,वाळूचा ट्रक चालकांची तपासणी केली की नाही हे तपासण्याची कुणी तसदी घेत नाही.
यामागचे कारण समजण्यास मार्ग नाही.तसेच बाहेर जिल्ह्यातून वाळूच्या गाड्यावर आजवर कारवाई झाली नाही किंवा कोणत्या नियमांनुसार शहरात वाळूची वाहने ये-जा करतात हा प्रश्न आहे.
पोलिसांना विचारले असता ते महसुलच्या अखत्यारित असल्याचे सांगतात, महसूलचे पथक मात्र गायब असते.यामुळे शहरात येणारे टिपर, ट्रक चालकांची कोणीच विचारणा करीत नाही,यामुळे वाहतूक करणारे बिनधास्त आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular