Tuesday, September 17, 2024
Homeवर्धाजामच्या तृप्ती हाटेल जवळ दुचाकी अनियंत्रित होऊन डिव्हायडरला धडकली,

जामच्या तृप्ती हाटेल जवळ दुचाकी अनियंत्रित होऊन डिव्हायडरला धडकली,

युवक गंभीर जखमी

समुद्रपुर:-
जामच्या तृप्ती हाटेल जवळ दुचाकी अनियंत्रित होऊन डिव्हाडरला धडकली यात दुचाकी चालक युवक गंभीर जखमी झाला.


दिनेश प्रकाश गवाने रा. उमरी (जिरा) वय ३५ असे जखमी युवकांचे नाव आहे. सदर युवकाच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
नागपूर चंद्रपूर महामार्गावरील समुद्रपूर तालुक्यातल्या जाम येथे तु्प्ती हाँटेल जवळ दुचाकी वरून नियंत्रण सुटल्याने डिवायडरवर दुचाकी आदळली.अपघाताची माहिती होताच १०८ क्रमांकावर नागरिकांनी माहिती दिली दरम्यान रुग्ण वाहिकेने जखमीला समुद्रपुर ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र या युवकांच्या डोक्यावर जबर जखम झाल्याने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले
घटनेची नोंद समुद्रपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular