Sunday, September 8, 2024
Homeचंद्रपुरशेतकऱ्यांची भिस्त चण्यावरतुळजापूर शिवारात सवंगणी मळणीची कामे जोरात

शेतकऱ्यांची भिस्त चण्यावर
तुळजापूर शिवारात सवंगणी मळणीची कामे जोरात

सेवाग्राम :
तुळजापूर. वघाळा. जयपूर. खरांगणा(गोडे) कुटकी. तळोधी परीसरात चना पिक हंगामाला वेग आला आहे. आठवड्यात ढगाळी वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी चना सवंगणीची लगबग सुरू झाली आहे .

गेल्या सप्ताहात ढगाळी वातावरण असल्याने काहि शेतकऱ्यांनी चना सवंगणी लवकर उरकल्या यानंतर मळणी केली पण चना हिरवाच असल्याने घरी वाळवून साठवण करावी लागली. तुळजापूर परीसरात चना मळणीसाठी पोषक असे वातावरण नसल्याने चना हिरवाच होता. सवंगणी झाल्या नंतरही चनाला कडक वाळू दयावा लागला. उघडझाप
ढगाळी वातावरणात चना शेतात पसरलेला होता.त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.
शेतकऱ्याचे मुख्य पीक कपासी आणि सोयाबीन पिकावर नैसर्गिक कोप झाल्याने हातातील पीक गेले .त्यामुळे बळी राजा मेटाकुटीस आला आहे. तुळजापूर परिसरात या वर्षी चना विपूल प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरणी केली. शेतकऱ्यांची भिस्त चना पिकावर आहे .

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

05/09/2024

03/09/2024

02/09/2024