Tuesday, September 17, 2024
Homeचंद्रपुरभारताची खरी संस्कृती जपत नवीन वर्षा निमित्त या संघटनेच्या माध्यमातून एक स्तुत्य...

भारताची खरी संस्कृती जपत नवीन वर्षा निमित्त या संघटनेच्या माध्यमातून एक स्तुत्य कार्यक्रम श्री.देवराव भोंगळे

नवीन वर्ष २०२१चे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प. पुज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर च्या वतीने दारू व्यसनमुक्ती वर जनजागृती पत्रक व दुध वाटपाचा कार्यक्रम चंद्रपूर बसस्थानकासमोर घेण्यात आला या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.देवराव भाऊ भोंगळे हे होते.

तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प.पूज्य शेषराव महाराज व्यसन मुक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मा..अनिल डोंगरे हे होते ,तर मुख्य अतिथी व्यसनमुक्तीचे प्रदेश सचिव संजयजी बुटले ,, जिल्हाउपाध्यक्ष लक्ष्मीकांत धानोरकर , कोषाध्यक्ष पंडित काळे हे होते .कार्यक्रमाची सुरुवात प.पूज्य शेषराव महाराज यांच्या फोटोला माल्ल्यारपन करून झाली. सदर कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. अनिल डोंगरे यांनी संघटनेचे कार्य व संघटनेचे उद्दिष्ट सांगताना चंद्रपूर जिल्यातील दारू व्यसनाच्या आहारी गेलेला समाज व्यसन मुक्त करणे हेच एक या संघटनेचे उद्दिष्ट्य असून नवीन वर्षाच्या पर्वावर समाजात दारू व्यसन मुक्तीचा एक चांगला मॅसेज जाऊन समाज व्यसन मुक्त करणे हेच या संघटनेचे ध्येय आहे.अशे ते बोलले.आपले उदघाटनिय *मार्गदर्शन करताना मा.देवराव भोंगळे यांनी मी या संघटनेच्या कायकर्मात बरेच दा कार्यक्रमात उपस्थित असल्यामुळे मला नेहमी आनंद,अभिमान होत असतो. जिल्यात दारू बंदी असो ,नसो कोणतेही व्यसन हे बंदी मुळे माणसाच्या शरीरातून नष्ट होत नसून अश्याप्रकारच्या कार्यापासून माणसाच्या विचाराने शरीरातून मुक्त होत असतात या संघटनेच्या माध्यमातून समाजाला फायदा होत असून ही संघटना निशुल्क समाजाला सेवा देत असून शासनाची कोणत्याही प्रकारची मदतीची अपेक्षा न करता निर्वीवादपणे ही संघटना काम करीत आहे .संघटनेचे कार्य आशेच जोमाने सुरू राहावे.तसेच संघटनेच्या या अतुलनीय कार्याचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे अशे भरभरून त्यांनी *संघटनेच्या कार्याचे कौतुक केले.* कार्यक्रमाच्या शेवटी दारू वेसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना संदेश म्हणून संदेश पत्रक वाटून , आज पासून दारू न पिता दूध पिऊन जीवनाची सुरवात करा .म्हणून दूध वाटण्यात आले.*
हा कार्यक्रम प.पुज्य शेषराव महाराज व्यसन मुक्ती संगठना जिल्हा चंद्रपूर च्या वतीने घेण्यात आला
या कार्यक्रमाचे संचालक संघटनेचे जिल्हा संघटक बालाजी बोरकुटे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री. दीगाबर वासेकर तालुका अध्यक्ष राजूर.श्री.प्रकाश भोयर तालुका अध्यक्ष बलारपुर.श्री.प्रकाश अल्गमकर.श्री.बंडू गोहणे.श्री.अरुण बावणे.श्री.बाबुराव मुंगुले.श्री.घुवले श्री. दुधाराम चरडूके.इत्यादींनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्यातून संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते ,पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular