Tuesday, September 17, 2024
Homeचंद्रपुरगरजू , वेडसर , रुग्णांना फळं तसेच ब्लँकेट , कपडे वितरण ..

गरजू , वेडसर , रुग्णांना फळं तसेच ब्लँकेट , कपडे वितरण ..

शेगाव बू : स्थानिक शेगाव येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तसेच टाइगर ग्रुप चंद्रपूर शाखा वरोरा चे कार्यकर्ते श्री सलीम पठाण यांच्या वाढ दिवसाचं औचित्य साधून आपला जन्म दिवस साधा पद्धतीने साजरा करून जन्म दिवसाला लागणारा खर्च योग्य कामा करिता सत्कर्मी लागावा या करिता वरोरा येथील वृद्धाश्रम येथील वृद्ध महिला पुरुष यांना ब्लँकेट चे वाटप करण्यात आले ..


तर येथील उप जिल्हा रुग्णालय येथील रुग्णांना फळं तसेच बिस्कीट वाटप करण्यात आले. याच सोबत भटकंती करणारे वेडसर लोकांना सुधा मायेचा घास म्हणून त्यांना ब्लँकेट , फळं , अल्पोहर देऊन एक आगळा वेगळा जन्म दिवस साजरा केला …
यावेळी टाइगर ग्रुप चंद्रपूर चे प्रमुख श्री अनिल जाधव , वृषभ , राम पाटील , निलेश , अमन नायडू , मारोती नामे , वैभव टिपले , प्रणय किर्तने , आयुष आगलावे , सहील मुडे , कुणाल काकडे , विनीत आत्राम , कार्तिक घोडे , पंकज बंसोड , मोसिमा पठाण , नाना राजन हिरे , सचिन दुडूरे , वसंता मेश्राम , अरुण नैताम , नितेश काम डी, संदीप भोगेकर , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular