हिंगणघाट : हरियाणा राज्यातील सोनीपत येथून कोचीन येथे 49 रेडे विनापरवाना कोंबून नेणाऱ्या कंटेनरवरती आज 24 ऑक्टोंबर रोजी हिंगणघाट पोलिसांनी कारवाई केली . पोलिसांनी दुपारी 12 वाजताचे दरम्यान येथील उपजिल्हा रुग्णालयाचे परिसरात कंटेनर क्र . एचआर 74 – ए – 9096 सह चालकास ताब्यात घेतले .
रविवारी 24 ऑक्टोंबर रोजी दुपारी 12वाजताच्या सुमारास हिंगणघाट शहरातून जाणाऱ्या नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील उपजिल्हा रुग्णालय चौकात सोनीपत (हरियाणा) वरुन कोचीन (केरळ) येथे विनापरवाना 49 रेडे कोंबून नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . यावेळी हिंगणघाट पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयाजवळील उड़ाणपुलाजवळ उभ्या असलेल्या रेडे वाहतुक करणाऱ्या कंटेनरची तपासणी केली असता सत्यता आढळून आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत कंटेनर चालकास कंटेनर तसेच 49 रेड्यांसह ताब्यात घेतले . पुढील तपास ठाणेदार संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात हिंगणघाट पोलीस करीत आहे .